मेलबर्न : क्रिकेटच्या एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात येतं. 1 लाख रुपये आणि ट्रॉफी असं या मॅन ऑफ द मॅच पुरस्कराचं स्वरुप असतं. सध्या टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळण्यात आहे. (Border Gavaskar Trophy 2020) एकूण 4 सामन्यांची ही मालिका आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामना असणार आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर म्हणून स्पेशल मेडल देण्यात येणार आहे. या सामन्यात सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूला जॉनी मुलाघ (Johnny Mullagh) मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. best performing player in the Australia vs India ‘Boxing Day’ match will be awarded the Johnny Mullagh Medal
The best player in the Boxing Day Test will be awarded the Mullagh Medal, named after the legendary Johnny Mullagh, captain of the 1868 cricket team who became the first Australian sporting team to tour internationally! #AUSvIND pic.twitter.com/3Ymx3QE4dS
— Cricket Australia (@CricketAus) December 21, 2020
जॉनी मुलाघ हे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार होते. उनारिमन असं त्यांच खरं नाव होतं. मुलाघ हे परदेश दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणारे पहिले कर्णधार होते. मुलाघ यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया 1868 मध्ये ब्रिटेन दौऱ्यावर गेली होती. मुलाघ यांनी या दौऱ्यात एकूण 45 सामने खेळले होते. यामध्ये त्यांनी 23च्या सरासरीने 1 हजार 698 धावा केल्या होत्या. त्यांनी गोलंदाजी करताना एकूण 1 हजार 877 ओव्हर टाकल्या. या 1 हजार 877 ओव्हरपैकी त्यांनी 831 ओव्हर या निर्धाव (मेडन) टाकल्या. तर एकूण 257 विकेट्स घेतल्या. निर्णायक क्षणी त्यांनी टीम साठी विकेटकीपरची भूमिका बजावली होती. विकेटकीपर म्हणून त्यांनी 4 फलंदाजांना स्टंपिग आऊट केलं.
या मेडलचा आकार हा पार्लेजीच्या बिस्किटासारखं आहे. या मेडलच्या खालील बाजूस THE MULLAGH MEDAL असं लिहिलेलं आहे. तसेच या मेडलच्या मध्यभागी एक फोटोही आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात हे मेडल जिंकण्याचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असेल. यामुळे हे पदक नक्की कोणत्या खेळाडूला मिळतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
Australia vs India 2nd Test | दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल होणार
Australia vs India 2nd Test | “टीम इंडिया अडचणीत, मदतीसाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा”
Australia vs India | ऑस्ट्रेलियातून निघण्याआधी विराटची सहकाऱ्यांसोबत विशेष बैठक, ‘या’ विषयावर चर्चा
best performing player in the Australia vs India ‘Boxing Day’ match will be awarded the Johnny Mullagh Medal