…म्हणून भारतीय संघात भुवनेश्वरला स्थान मिळालं नाही, समोर आलं मोठं कारण!

भुवनेश्वरने जानेवारी 2018 च्या नंतर फर्स्ट क्लास सामना खेळला नाही. त्याने शेवटचा सामना जानेवारी 2018 मध्ये जोहान्सबर्गला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. (Bhuvneshwar kumar Dropped World test Championship Final And India vs England)

...म्हणून भारतीय संघात भुवनेश्वरला स्थान मिळालं नाही, समोर आलं मोठं कारण!
भुवनेश्वर कुमार
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 7:53 AM

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) आणि इंग्लंडच्या (Ind vs ENG) कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. त्याचा संघात समावेश न केल्याने विविध चर्चा सुरु होत्या. त्याचा संघात समावेश का होऊ शकला नाही, यावरुन बरंच मंथन सुरु होतं. अखेर त्याच्या संघातल्या न समावेश होण्याचं कारण समोर आलं आहे. (Bhuvneshwar kumar Dropped world test championship Final And India vs England test series)

भुवनेश्वर कुमारला बाहेर का बसवलं?

भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश न होण्यापाठीमागचं पहिलं कारण आहे, त्याने कसोटी क्रिकेट खेळून बराच कालावधी लोटला आहे. भुवीने गेल्या काही महिन्यात टेस्ट क्रिकेट खेळलेलं नाही. शेवटी कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये बोलर कितीही अव्वल दर्जाचा असला तरी फॉरमॅटची प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं.

टेस्टसाठी भुवी अनफिट?

सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे, निवड समितीला असं वाटतंय की भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेटसाठी सध्या फिट नाहीय. विशेष करुन लांबलचक दौऱ्यासाठी तो अजूनही पूर्णपणे फिट नाही.

दुसरीकडे भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जे सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी चांगलं प्रदर्शन केलंय. अशा स्कॉडला पुन्हा इंग्लंड दौऱ्यात संधी द्यायला हवी, या मताची निवड समिती आहे.

जानेवारी 2018 पासून भुवी फर्स्ट क्लास खेळला नाही

भुवनेश्वरने जानेवारी 2018 च्या नंतर फर्स्ट क्लास सामना खेळला नाही. त्याने शेवटचा सामना जानेवारी 2018 मध्ये जोहान्सबर्गला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. यानंतर मर्यादित ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये भुवीला निवडलं गेलं आणि खेळवलं गेलं. परंतु कसोटी क्रिकेटसाठी त्याला पूर्णपणे फिट मानलं गेलं नाही.

फिटनेसशी भुवीचा संघर्ष

भुवनेश्वर कुमारला आयपीएलच्या 13 व्या मोसमात चेन्नई सपर किंग्जविरोधातल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून त्याने माघार घेतली होती. भुवीने सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमधून पुनरागमन केलं होतं ज्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये निवडलं गेलं. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यात 6 विकेट् घेतल्या तर 5 टी ट्वेन्टी सामन्यात चार विकेट्स घेतल्या.

(Bhuvneshwar kumar Dropped world test championship Final And India vs England test series)

हे ही वाचा :

सुरेश रैनानंतर हरभजनच्या मदतीला धावला सोनू सूद, म्हणाला, ‘काम होऊन जाईल…!’

कुलदीप यादव म्हणतो, “मला माही भाईची खूप आठवण येतीय, त्याने निवृत्ती घेतल्यापासून मी….”

PHOTO | लई भारी! कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी विरुष्काने जमवले 11 कोटी

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.