Naseem Shah : पाकिस्तान टीमला मोठा धक्का, नसीम शाह रुग्णालयात दाखल
पाकिस्तानचा स्टार गोलंदाज नसीम शाह हा अजारी अजून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूंनी (Pakistan Player) आशिया चषकात (Asia Cup 2022) चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) अधिक तारीफ केली आहे. आशिया चषकातील अंतिम सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यामुळे अंतिम सामन्यात पराभव झाला. हा पराभव पाकिस्तानच्या चाहत्यांच्या इतका जिव्हारी लागला की चाहत्यांनी सोशल मीडियावर पुन्हा टीका केली.
पाकिस्तानचा स्टार गोलंदाज नसीम शाह हा अजारी अजून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला मागच्या काही दिवसांपासून ताप आहे, तसेच त्याला व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं समजतंय.
नसीम शहा मंगळवारी दिवसभर त्याच्या रुममध्ये होता. तसेच त्याच्या विविध टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्याला डेंग्यू झाला असावा अशी डॉक्टरांनी शक्यता व्यक्त केली आहे.
सध्या पाकिस्तानच्या टीमचा स्टार गोलंदाज नसीम शहा आजारी असल्यामुळे पाकिस्तानची मोठी अडचण झाली आहे. त्याने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर इंग्लंड विरुद्ध सध्या सुरु असलेल्या मालिकेत यापुढे तो किती सामने खेळणार नाही हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.