मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे आशिया चषक (Asia Cup) 2022 च्या संघात निवड झाली नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 2022 च्या टी20 विश्वचषकातही त्याच्या खेळण्याबाबत शंका आहेत. त्याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने चिंता व्यक्त केली आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर होण्यास फक्त एक महिना शिल्लक आहे. त्याच्या स्थितीनंतर त्याला संघात क्वचितच समाविष्ट केले जाऊ शकते असंही बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय संघाचा भरवशाचा गोलंदाज अशी जसप्रीत बुमराहची ओळख आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत चांगल्या खेळाडूंना बाद केले आहे. तसेच सामना जिंकून देण्याची त्याच्यात क्षमता देखील आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मीडियाशी बोलताना सांगितले की, ही चिंतेची बाब आहे. बुमराह त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे अडचणीत आहे. त्याला सर्वोत्तम वैद्यकीय सल्ला दिला जाईल असंही बीबीसीने म्हटलं आहे. अडचण अशी आहे की ही त्याची जुनी दुखापत आहे. टी-20 विश्वचषकासाठी आमच्याकडे फक्त दोन महिने शिल्लक आहेत आणि त्याला ही दुखापत खूप वाईट वेळी झाली आहे. आम्ही त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. तो आमच्या संघातील सर्वोत्तम गोलंदाज आहे आणि त्याच्या दुखापतीचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तज्ज्ञांच्या मते, त्यांच्या गोलंदाजी अॅक्शनमुळे त्याला ही समस्या येते. त्याच्या कृतीचा त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होऊन तो पुन्हा पुन्हा जखमी होत आहे. या दुखापतीतून तो आता सावरल्याचे दिसतं होतं. तो भारतासाठी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये खेळला आहे, पण पुन्हा एकदा या दुखापतीने त्याला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. जर बुमराह योग्य वेळी तंदुरुस्त होऊ शकला नाही आणि T20 विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघाचा भाग बनू शकणार नाही, तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल असंही बीबीसीने स्पष्ट केलं आहे.