भारताच्या माजी स्पिनरचा मोठा दावा, म्हणाला “धोनी जोपर्यंत CSK मध्ये आहे, तोपर्यंत वेगळा कर्णधार असू शकत नाही”
गेल्यावर्षी रविंद्र जाडेजाला चेन्नई सुपर किंग्ज टीमचं कर्णधार पद देण्यात आलं होतं.
मुंबई : यंदाच्या आयपीएल (IPL2023) स्पर्धेची तयारी आतापासून सुरु झाली आहे. काल कोणत्या खेळाडूला टीमने कायम केले याची यादी जाहीर झाली आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर (Social Media)आयपीएलची जोरदार चर्चा सुरु आहे. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सुद्धा आयपीएल स्पर्धा संपल्यावर t20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. आतापर्यंत धोनीने CSK टीमसाठी अनेकदा आयपीएलचा चषक जिंकून दिला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाला सुद्धा त्याने दोनवेळा विश्वचषक जिंकून दिला आहे.
टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याने एक दावा केला आहे. तो म्हणतोय की, “जोपर्यंत चेन्नई सुपर किंग्जमध्ये धोनी तोपर्यंत इतर कोणीही कर्णधार असू शकत नाही. विशेष म्हणजे जर CSK टीमसाठी कर्णधार शोधत असतील, तर तो कर्णधार पाच ते सहा वर्षांसाठी असेल. कारण चेन्नई सुपर किंग्ज या टीममध्ये सध्या मोठा बदल सुरु आहे.”
गेल्यावर्षी रविंद्र जाडेजा याला चेन्नई सुपर किंग्ज टीमचं कर्णधार पद देण्यात आलं होतं. परंतु चेन्नई सुपर किंग्ज कामगिरी खराब झाल्यानंतर जाडेजाकडून कर्णधार पद काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला पुन्हा कर्णधार पद देण्यात आलं होतं.
चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवलेले खेळाडू
एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुकेश चौधरी, मशिन चौधरी. , दीपक चहर , प्रशांत सोळंकी , महेश थिकना
कायम न ठेवलेले खेळाडू: ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्ने, हरी निशांत, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीसन