अरे देवा, असं कुणी आऊट होत का बरं? केन विलियमसन याने पायावर पाडून घेतला धोंडा, तुमचा पण संताप अनावर होणार

Kane Williamson Big Mistake : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचे मानले जाते. केव्हा काय चमत्कार होईल, अथवा काय धक्का बसेल, सांगताच येत नाही. आता न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियमसनची ही मोठी चूक तुम्ही पाहाल, तर डोक्याला हात लावाल. हसाल आणि संताप पण व्यक्त कराल.

अरे देवा, असं कुणी आऊट होत का बरं? केन विलियमसन याने पायावर पाडून घेतला धोंडा, तुमचा पण संताप अनावर होणार
असं कुणी आऊट होत का बरं?
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 4:38 PM

क्रिकेटमध्ये केव्हा काय घडेल हे सांगताच येत नाही. कोणाला केव्हा काय धक्का बसेल हे कळतच नाही. सध्या न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये तिसरी आणि शेवटची मालिका हॅमिल्टन येथील मैदानात सुरू आहे. पण या मॅचमधील हा क्षण सध्या क्रीडा जगतातच नाही तर जगभर व्हायरल होत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. आता न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियमसनची ही मोठी चूक तुम्ही पाहाल, तर डोक्याला हात लावाल. हसाल आणि संताप पण व्यक्त कराल.

…अन् विलियमसन याने पायावर पाडून घेतला धोंडा

हे सुद्धा वाचा

तर शनिवारी हा सामना रंगात आला होता. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियमसन याने या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी केली. पण तो अर्ध शतकी खेळी करू शकला नाही. त्याने 87 चेंडूत 9 चौकार मारले आणि 44 धावांची खेळी खेळली. त्याला मॅथ्यू पॉट्सने असं बोल्ड केलं की सर्वच जण अवाक झाले. तो अत्यंच विचित्र पद्धतीने आऊट झाला. आपलाच हा प्रताप पाहून केन विलियमसन सुद्धा नाराज झाला. त्याने स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेतला. त्याच्या आऊट होण्याचा हा अतरंगी प्रकार सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. ही ना धावचित आहे ना, पायचित तर ही मानवी चूक असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच्या चाहत्यांनी विलियमसनच्या चुकीने नाराजी व्यक्त केली आहे.

घडलं तर काय?

तर विलियमसन हा 59 व्या षटकात शेवटच्या चेंडूवर खेळत होता. त्याला या चेंडूने चकवा दिला. चेंडू हा त्रिफळ्याकडे जात असताना अत्यंत वेगाने विलियमसन याने हा चेंडू थांबवण्याचा भाबडा प्रयत्न केला आणि बिचारा तिथंच चुकला. त्याच्याकडून भलतीच चूक झाली. हा चेंडू त्याने पायानेच त्रिफळ्यावर, स्टम्पवर मारला. आपल्याच पायाने त्याने स्वत:लाच मोठा झटका दिला. या कृतीने त्याची निराश एकदम चेहऱ्यावर झळकली. त्याच्या व्हिडिओवर एका युझर्सने चपखल प्रतिक्रिया दिली, “ऐसा कौन बोल्ड होता है भाई”, असं कुणी आऊट होतं का? असा सवाल सध्या क्रिकेट फॅन्स त्याला विचारत आहेत. विलियमसन याला कोणी आऊट करत नव्हतं म्हणून त्यानेच स्वतःला आऊट केलं अशी पण एक प्रतिक्रिया समोर आली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.