Bihar: बनावट दारूमुळे 27 जणांचा मृत्यू, मंत्री म्हणतात “पॉवर वाढवा,सर्व काही…”
बनावट दारूमुळे 27 जणांचा मृत्यू, मंत्र्यांचं बेताल वक्तव्य, पाहा काय म्हणाले
मुंबई : काही राज्यात अनेक ठिकाणी बनावट दारु (fake alcohol) विक्री होत असल्याचं उदाहरण आपण पाहतो. परंतु ती दारु शरिराला किती हानीकारक आहे, हे एका प्रकरणातून उघडकीस आले आहे. बनावट दारुचं सेवन केल्यामुळे बिहारमधील (Bihar) 27 जणांचा मृत्यू झाला आहे. अजून काही जण चिंताजनक असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भिती डॉक्टरांनी (Doctor) व्यक्त केली आहे.
बिहारमधील छपरा येथे हा प्रकार घडला आहे, छपरामधील एका सरकारी रुग्णालयात बाधित व्यक्तीवरती उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे बिहारच्या विधानसभेत हा मुद्दा एका मंत्र्यांने उपस्थित करुन नाराजी व्यक्त केली. परंतु समीर महासेठ या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.
ज्यावेळी एका कार्यक्रमात समीर महासेठ या मंत्र्याला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने बेताल वक्तव्य केलं. त्याने खेळून शरिराची पॉवर वाढवा, त्यामुळे तुम्हाला विषाची दारु सुद्धा पचवता आली पाहिजे.
समीर महासेठ हे एवढ्यावरचं थांबले नाहीत, त्यांनी बिहारमध्ये मिळत असलेल्या विषारी दारुपासून तुम्हाला वाचायचं असेल तर शरिराची पॉवर वाढवा असं विधान केलं आहे. ज्यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी भाजपवरती हल्ला केला.