तू क्रिकेटची हत्या केलीस; भाजपचे खासदार महाशय हनुमा विहारीवर भडकतात तेव्हा…

भारताचे प्रमुख फलंदाज माघारी परतल्यानंतर हनुमा विहारीने एक बाजू लावून धरत भारताचा पराभव टाळला. मात्र, या नादात हनुमा विहारीने 109 चेंडूत अवघ्या 7 धावा केल्या. | Babul Suprio

तू क्रिकेटची हत्या केलीस; भाजपचे खासदार महाशय हनुमा विहारीवर भडकतात तेव्हा...
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 3:30 PM

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटीत (Aus vs Ind 3rd Test )हनुमा विहारी याने केलेल्या संथगती खेळीवर भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी जोरदार टीका केली आहे. सिडनी कसोटीच्या शेवटच्या डावात भारताचे प्रमुख फलंदाज माघारी परतल्यानंतर हनुमा विहारीने (Hanuma Vihari )एक बाजू लावून धरत भारताचा पराभव टाळला. मात्र, या नादात हनुमा विहारीने 109 चेंडूत अवघ्या 7 धावा केल्या. (BJP MP Babul Suprio slams Hanuma Vihari Playing 109 Balls To Score 7 runs)

हनुमा विहारीच्या याच कुर्मगती फलंदाजीवर बाबुल सुप्रियो यांनी ताशेरे ओढले. हा अत्याचार आहे. हनुमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही, तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. विजयाकडे पर्याय म्हणून न बघणे, मग तो कितीही दुरापास्त असू दे, असे करणे म्हणजे गुन्हा आहे, असे सुप्रियो यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे. मात्र, आपल्याला क्रिकेटमधील काहीही कळत नाही, असी पुस्तीही खासदार महोदयांनी ट्विटमध्ये जोडली आहे.

जर हनुमा विहारीने खेळपट्टीवर फक्त उभे राहण्यापेक्षा वाईट चेंडूंवर चौकार मारले असते तर कदाचित भारताला ऐतिहासिक विजय मिळाला असता. कोणी अपेक्षा केली नव्हती, ते पंतने करुन दाखवले. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्यामुळे त्याने खराब चेंडूंवर चौकार ठोकायला पाहिजे होते, असेही बाबुल सुप्रियो यांनी म्हटले.

हनुमा विहारी-अश्विनची झुंजार भागीदारी

ऋषभ पंत पाठोपाठ पुजारा आऊट झाला. टीम इंडियाने महत्वाच्या दोन फलंदाजांची विकेट गमावली. त्यामुळे विजयाची आशा कमी झाली. यावेळेस टीम इंडियाचा पराभव होण्याची शक्यता होती. सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरणारी ही वेळ होती. त्यामुळे अश्विन आणि विहारीच्या खांद्यावर जबाबदारी होती. पुजारा बाद झाल्यानंतर टीम इंडियाची धावसंख्या 5 बाद 272 अशी होती.

अश्विन-विहारीने खेळायाला सुरुवात केली. अतिशय शांतपणे या दोघांनी खेळ केला. कांगारुंनी ही जोडी फोडण्यासाठी सर्व मार्ग अवलंबले. मात्र, या दोघांनी आपला संयम सोडला नाही, दोघेही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत होते. या दोघांनी 259 चेंडूंचा सामना केला. यात या दोघांनी नाबाद 62 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळे भारताला हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले. या दोघांनीही प्रत्येकी 100 पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला. अश्विनने 128 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 39 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 161 चेंडूमध्ये 4 चौकारांसह नाबाद 23 धावा केल्या.

संबंधित बातम्या:

Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला

Australia vs India, 3rd Test, 5th Day Live : संकटमोचक हनुमा विहारीला अश्विनची साथ, तिसरी कसोटी ड्रॉ

‘तू तो देवमाणूस निकला रे’; दुखापतीनंतरही आक्रमक 97 फटकावणाऱ्या ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव

(BJP MP Babul Suprio slams Hanuma Vihari Playing 109 Balls To Score 7 runs)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.