बीकेटीने ‘ऑफिशियल टायर पार्टनर’ म्हणून मुंबई इंडियन्ससोबत वाढवली भागीदारी

यंदाचं आयपीएल सुरु होण्यापुर्वी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक टीमचे चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर यंदाचं आयपीएल कोण जिंकणार याची सुध्दा भविष्यवाणी आतापासून वर्तवली जात आहे.

बीकेटीने 'ऑफिशियल टायर पार्टनर' म्हणून मुंबई इंडियन्ससोबत वाढवली भागीदारी
Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 1:46 PM

मुंबई – आयपीएलच्या (Ipl 2023) हंगामाची सध्या सगळीकडं चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर आतापासून आयपीएलबाबत चाहते तर्कवितर्क लढवत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) आयपीएलच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. यावर्षी आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी), पाच वेळा विजेता ठरलेली मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai indians) आगामी क्रिकेट लीग 2023 मध्ये ‘ऑफिशियल टायर पार्टनर’ म्हणून कायम आहे. या वर्षी बीकेटी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सहकार्याचा चौथा हंगाम आहे.

सलग चौथ्या वर्षी भागीदारी

या भागीदारीबद्दल बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांनी आनंद व्यक्त केला, त्यानंतर ते म्हणाले, “मुंबई इंडियन्ससोबत सलग चौथ्या वर्षी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. 160 देशांमध्ये आमची उपस्थिती आहे आणि जगभरातील क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आम्ही मुंबई इंडियन्ससोबत त्यांच्या क्रिकेट विषयक क्रीडाभावनेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहोत.”

हे सुद्धा वाचा

बीकेटी जगभरातील विविध क्रीडा स्पर्धांचे समर्थक

क्रिकेटपासून फुटबॉलपर्यंत ते अगदी मॉन्स्टर जॅमच्या अद्भुत कलाबाजीपर्यंत बीकेटी जगभरातील विविध क्रीडा स्पर्धांचे समर्थक आणि अनुयायी म्हणून ओळखले जाते, बीकेटीने जागतिक स्तरावर क्रिकेटवर आपले प्रेम दाखवले आहे आणि केएफसी बिग बॅश लीग (ऑस्ट्रेलियन क्रिकेट लीग) साठी ‘ऑफिशियल ऑफ-हायवे टायर पार्टनर’ आहे. बीकेटीने मॉन्स्टर जॅम यूएसए, ला लीगा स्पॅनिश फुटबॉल लीग, इटालियन सेरी बी फुटबॉल चॅम्पियनशिप, लीग डी फुटबॉल प्रोफेशनल फ्रान्स, रग्बी वर्ल्ड कप फ्रान्स, युनायटेड रग्बी चॅम्पियनशिप आणि 2023 मध्ये युरोलीग बास्केटबॉल यासारख्या इतर विविध जागतिक क्रीडा स्पर्धांसाठी भागीदारी केली आहे.

यंदाचं आयपीएल सुरु होण्यापुर्वी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक टीमचे चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर यंदाचं आयपीएल कोण जिंकणार याची सुध्दा भविष्यवाणी आतापासून वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा किताब जिंकला आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.