Video : कॅच घेण्याच्या नादात खेळाडू झाला जखमी, 4 दात तुटले
Video : झेल घेत असताना बॉल पडला तोंडावर, कॅच पकडला, पण चार दात तुटले
मुंबई : कॅच (Catch) पकडत असताना अनेक खेळाडू जखमी झाल्याचे पाहायला मिळतात. आतापर्यंत कधी दोघांची धडक झाली आहे, तर कधी एखादा झेल घेत असताना झेप मारल्यामुळे खेळाडू जखमी (Player Injured) झाले आहेत. परंतु कालच्या मॅचमध्ये एक वेगळा प्रकार पाहावयास मिळाला. तो म्हणजे असा की, फलंदाजाने मारलेला चेंडू उंच गेला. परंतु कॅच घेण्याचं टायमिंग चुकल्यामुळे बॉल (ball) तोंडावर येऊन पडला.
ही घटना काल श्रीलंका प्रिमियर लीगमध्ये घडली आहे. कॅच पकडताना चामिका करुणारत्ने हा खेळाडू जखमी झाला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्यांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याचे चार दात तुटले असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
Update on Chamika ?
Chamika karunarathne is out of today’s game. He lost four teeth in the accident and is on his way to the Galle for immediate surgery with Team Doctor
He’s stable and will be available for the Kandy stage
Team Director – Shyam Impett#sportspavilionlk pic.twitter.com/kIeGraZjTC
— DANUSHKA ARAVINDA (@DanuskaAravinda) December 7, 2022
दात पुर्णपणे तुटले असल्यामुळे ऑपरेशन करावं लागलं आहे. उंच गेलेला बॉल थेट त्याच्या पुढच्या दातांवर पडल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला दोन खेळाडू देखील आहेत. त्याने कॅच सुध्दा पकडली आहे.
Chamika Karunaratne suffered an injury while attempting a catch during the #LPL2022 match in Hambantota.
He has been hospitalized and is expected to undergo surgery.
It is believed the cricketer has lost several front teeth.
Video- AdaDerana #lka #SriLanka #CricketTwitter pic.twitter.com/84rxt0TF8a
— Dasuni Athauda (@AthaudaDasuni) December 7, 2022
गॉल ग्लैडिएटर्स आणि कैंडी फाल्कन यांच्यात काल मॅच सुरु होती. कैंडी फाल्कन टीमचा चामिका करुणारत्ने खेळाडू आहे.
ज्यावेळी हा प्रकार मैदानात झाला, त्यावेळी चामिका करुणारत्ने तात्काळ मैदानातून बाहेर पडला. चामिका करुणारत्नेच्या चाहत्यांना सुद्धा हा प्रकार पाहिल्यानंतर अधिक वाईट वाटलं.