Team India | टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, बीसीसीआयची घोषणा
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून हे बदल पाहायला मिळणार आहेत.
मुंबई : टीम इंडियाला (Team india Kit Sponsor) नवा कीट स्पॉन्सर मिळाला आहे. याची माहिती भारतीय नियमाक क्रिकेट मंडळ (BCCI) अर्थात बीसीसीआयने दिली आहे. मोबाईल प्रीमिअर लीग (MPL) म्हणजेच एमपीएलसोबत हा करार करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. एकूण 3 वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2023 पर्यंत हा करार असणार आहे. कीट आणि स्पोर्ट्स क्लोथसाठी हा करार करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून एमपीएल अधिकृतरित्या किट स्पॉन्सर करण्याची सुरुवात करणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून टीम इंडियाच्या जर्सीवर आणि कीटवर एमपीएलचा लोगो पाहायला मिळणार आहे. board of control for cricket in india has annunced MPL sports official kits sponsor
? NEWS ?: BCCI announces MPL Sports as Official Kit Sponsor for Team India
As part of a three-year deal, MPL Sports designed and manufactured jerseys will be worn by Men's, Women’s and the Under-19 INDIAN cricket teams.
More details ? https://t.co/Cs37w3JqiQ pic.twitter.com/VdIWcXGV8M
— BCCI (@BCCI) November 17, 2020
महिला आणि अंडर 19 टीम
या करारानुसार एमपीएल भारतीय पुरुष क्रिकेट संघासह, महिला आणि अंडर 19 संघालाही कीट स्पॉन्सर करणार आहे. बीसीसीआयसोबत झालेल्या करारानुसार, एमपीएलला खेळाडूंव्यतिरिक्त क्रिकेट चाहत्यांनाही किफायतशीर दरात कीट आणि जर्सी उपलब्ध करुण देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. म्हणजेच या अधिकारामुळे एमपीएलला क्रिकेट चाहत्यांना कीट आणि जर्सी विकता येणार आहे.
बीसीसीआय अध्यक्षांची प्रतिक्रिया
एमपीएलशी झालेल्या करारासंदर्भात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली. “हा भारतीय क्रिकेटचा एक नवीन टप्पा आहे.” आम्ही एमपीएलबरोबरच्या कराराकडे एक नवीन अध्याय म्हणून पाहतोय”, असं गांगुली म्हणाला. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून नव्या कीट स्पॉन्सरच्या शोधात होतो. मात्र एमपीएलमुळे आता शोध संपला आहे. एमपीएलसोबतच्या भागीदारीमुळे टीम इंडियाची जर्सी आणि देशातील इतर संबंधित उत्पादनांसाठी नवीन मार्ग उघडण्याचे काम करेल. “अशी प्रतिक्रिया बीसीसीआय सचिव जय शाहने दिली.
याआधी आतापर्यंत टीम इंडियाचा NIKE कंपनी कीट स्पॉन्सर होती. टाळेबंदी दरम्यान या कंपनीने पुढील कराराची मुदतवाढ करुन घेणार नसल्याचं म्हटलं होतं. तेव्हापासून बीसीसीआयने कीट स्पॉन्सरसाठी शोधाशोध सुरु केली. मात्र आता एमपीएलच्या रुपात टीम इंडियाला कीट स्पॉन्सर मिळाला आहे. दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रलिया दौऱ्यासाठी पोहचली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या :
India Tour Australia | विराट कोहलीमुळे अॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली
board of control for cricket in india has annunced MPL sports official kits sponsor