IND vs NED: नेदरलँड्सचा गोलंदाज म्हणतो, “या भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करणे विराटपेक्षा अवघड आहे”

नेदरलॅंडचा गोलंदाज पॉल वॉन मीकेरनने सुरुवातीला केए राहूलची विकेट घेतली होती.

IND vs NED: नेदरलँड्सचा गोलंदाज म्हणतो, या भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करणे विराटपेक्षा अवघड आहे
"या भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करणे विराटपेक्षा अवघड आहे"Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 11:07 AM

मेलबर्न : टीम इंडियाची (Team India) दुसरी मॅच नेदरलँड्सविरुध्द (Netherlands) झाली. सिडनीच्या मैदानात झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने 56 धावांनी विजय मिळविला. त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांचं पुन्हा एकदा सोशल मीडियावर कौतुक पाहायला मिळालं. कालच्या मॅचमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) आणि सुर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी पारी खेळली. विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव हे दोन खेळाडू आशिया चषकापासून चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. नेदरलॅंडचा गोलंदाज पॉल वॉन मीकेरनने मॅच संपल्यानंतर, “विराट कोहलीला एकवेळ बॉलिंग करणं सोप्पं आहे. परंतु सुर्यकुमार यादवला बॉलिंग करताना अधिक दबावाखाली असल्याचं” त्यानं सांगितलं.

कालच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने चांगली खेळी केली. 25 चेंडूत त्याने 7 चौके आणि 1 षटकार मारून 51 धावा काढल्या. आशिया चषकापासून सुर्यकुमार यादवचा चांगला फॉर्म राहिला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सुर्यकुमार यादवने गोलंदाजांची चांगली धुलाई केली. त्यावेळी सोशल मीडियावर त्यांच्या काही शॉट्सचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले होते.

हे सुद्धा वाचा

नेदरलॅंडचा गोलंदाज पॉल वॉन मीकेरनने सुरुवातीला केए राहूलची विकेट घेतली होती. कालच्या सामन्यात विराट कोहलीने चांगले शॉट्स खेळले. “सुर्यकुमार यादवला गोलंदाजी करीत असताना, तुम्ही थोडीसी जरी चुकी केली, तरी त्याची शिक्षा मिळते. त्यामुळे तुम्हाला गोलंदाजी करीत असताना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे विराट कोहलीपेक्षा सुर्यकुमार यादवला गोलंदाजी करणं अधिक अवघड असल्याचं” पॉल वॉन मीकेरनने याने सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.