अंकारा : फुटबॉलचा खेळ वेगासाठी ओळखला जातो. फुटबॉलच्या मैदानात नेहमीच उत्साह, जिद्द दिसून येते. फुटबॉलमध्ये खेळाडूं इतकाच प्रेक्षकांमध्ये जोश भरलेला असतो. पण याच फुटबॉलच्या मैदानात काहीवेळा खेळाला गालबोट लावणाऱ्या घटना सुद्धा घडतात. फुटबॉलच्या मैदानातील LIVE मॅचचा एक व्हिडिओ समोर आलय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्रेक्षकांबद्दल चीड निर्माण होईल. Bursaspor vs Amedspor सामन्यादरम्यान हे भयानक चित्र पहायला मिळालं.
सामना सुरु असताना Amedspor च्या खेळाडूंवर चाकू, फटाके आणि बॉटल्सनी हल्ला झाला. फॅन्सनी हा हल्ला केला होता. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. देशांर्गत फॅन्स या मॅच दरम्यान पूर्णवेळ अँटी-कुर्दीश गाणी गुणगुणत होतं.
संपूर्ण मॅच दरम्यान हल्ले
वॉर्म अप दरम्यान फॅन्सच्या मनात खेळाडूंबद्दल दिसलेला आक्रोश मॅच दरम्यानही कायम होता. 90 मिनिट सामना सुरु होता. या मॅचमध्ये पूर्णवेळ फॅन्स खेळाडूंवर चिडलेले होते. खेळाडूंवर पाण्याच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या. शेवटची शिट्टी वाजल्यानंतरही तमाशा कायम होता.
Meanwhile in Turkey ??
Bursaspor vs Amedspor 05/03/2023pic.twitter.com/a3J1nw44J1— 101% ULTRAS (@101ULTRAS) March 5, 2023
Meanwhile in Turkey ??
Bursaspor vs Amedspor 05/03/2023pic.twitter.com/a3J1nw44J1— 101% ULTRAS (@101ULTRAS) March 5, 2023
मैदानात सापडला चाकू
फिल्डवर एक चाकूही हाती लागला, त्यावरुन या प्रकाराची भीषणता लक्षात येते. Amedspor च्या टीमने या संपूर्ण प्रकाराची तक्रार केली आहे. ड्रेसिंग रुममध्ये प्रायव्हेट सुरक्षा सुपरवायजर, क्लब सुरक्षा अधिकारी, क्लब स्टाफ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी अपमानित केल्याचा दावा टीमने केला.
किती जणांना अटक?
टर्की फुटबॉल फेडरेशनकडून अजूनपर्यंत या संपूर्ण प्रकारावर कुठलही स्टेटमेंट आलेलं नाही. या प्रकरणात अजूनपर्यंत 5 जणांना अटक झाली आहे. मागच्या काही वर्षांपासून टर्कीमध्ये Amedspor क्लब वादात सापडला आहे. Amedspor क्लबच नाव कुर्दिश शहर Amed वरुन आहे. त्यावरुन हा सर्व वाद आहे.