‘विराट अंकल, मी वामिकाला डेटवर नेऊ शकतो का ?’ चिमुकल्याच्या प्रश्नाने नेटीझन्स भडकले
आयपीएल सत्रादरम्यान आरसीबीची मॅच सुरु असताना एका चिमुकल्याच्या हातातील फलक पाहून नेटीझन्स भडकले आहेत. त्यावर काय लिहीलंय हे त्याला समजतंय तरी का , असा सावल विचारत नेटकऱ्यांनी त्या मुलाच्या आई-वडिलांवर टीका केली आहे.
बंगळुरू : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 24 व्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK) विरुद्ध त्यांच्या घरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 8 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळाली. धोनीचा एक चाहता त्याची मूर्ती पाहण्यासाठी सातासमुद्रापार म्हणजेच न्यूयॉर्क येथून येथे पोहोचला होता, तर कोहलीला पाहण्यासाठी एक चाहता ऑस्ट्रेलियातून आला होता. पण या सगळ्यांमध्ये एक असा चाहता होता जो ना कोहलीचा चाहता होता ना धोनीचा. उलट हा चाहता कोहलीची मुलगी वामिकासाठी (vamika) आला होता.
आरसीबी आणि चेन्नई दरम्यान झालेल्या या सामन्यादरम्यान एक लहान मुलगा हातात एक फलक घेऊन उभा होता. ‘विराट काका, मी वामिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?’ असे त्यावर लिहीले होते. त्या लहानग्या मुलाचे फोटो सोशलवर वेगाने व्हायरल झाले. मात्र यावरून त्या मुलाचे कौतुक होत नसून त्यावर नेटीझन्सच्या तीव्र प्रतिक्रिया, कमेंट्स दिसत आहेत. काही लोकांना हे बिलकूल क्युट वाटले नाही, आणि त्यांनी या चिमुकल्या चाहत्यांच्या पालकांना फटकारले.
Here is something wrong with parenting, idk why people are finding it cute pic.twitter.com/xj5DqZHRmx
— Dr Nimo Yadav (@niiravmodi) April 17, 2023
No you cannot, not till you understand the meaning of the words that are written there !
Also, not till your parents understand that this isn’t cool/funny ??
Also, not till vamika wants to go out with you !#CricketTwitter https://t.co/nTq67Itvyk
— ????? ????? (@nihardesai7) April 18, 2023
एका यूजरने लिहिले की, “मी वामिकाचा पालक असतो, तर हे वाचून मला खूप राग आला असता! पालकांनीही हे सोशल मीडियाचे वेड थांबवले पाहिजे! इथे चूक तुमच्या मुलाची नव्हे तर तुमची आहे,” अशी कमेंट एकाने केली. तर एक युजरने लिहीले की ‘ त्यांनी वामिकाला एकटं सोडलं पाहिजे .’ एवढंच नव्हे तर आणखीही बऱ्याच कमेंट्स आहे. ‘ प्लीज वामिकाला एकटं सोडा. या बोर्डवर काय लिहिलंय ते त्या (लहान) मुलालाही समजत नाहीये. प्रसिद्धीसाठी लोकं काहीही करू शकतात ‘, अशा शब्दांत युजर्सनी त्या लहान मुलाच्या पालकांवर टीका केली आहे.
I would be very very angry if I was Vamika’s parents!
Also parents stop with this social media obsession! Not the child but you are creepy pic.twitter.com/grOthsNK1q
— Dr Pooja Tripathi (@Pooja_Tripathii) April 18, 2023
मुख्य म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांची मुलगी वामिकाबद्दल खूप संवेदनशील आहेत आणि सोशल मीडियावर कधीही त्यांच्या मुलीचा चेहरा दाखवत नाहीत. एवढेच नाही तर विमानतळावरही कोहली कॅमेरापर्सनला मुलीचे फोटो काढू नयेत अशा कडक सूचना देताना दिसत आहे.
दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये, बंगळुरू संघाने आतापर्यंत पाचपैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. हा संघ आता आपला पुढचा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध 20 एप्रिल रोजी मोहाली येथे खेळणार आहे.