KL Rahul: केएल राहुलला कसोटीत संधी देणे हे टीम इंडियाच्या पराभवाचे कारण असू शकते ?
चांगले खेळाडू असताना केएल राहुलला संधी दिल्यामुळे टीम इंडिया कसोटी गमावण्याची शक्यता
मुंबई : टीम इंडिया (IND) सध्या बांगलादेश (BAN) दौऱ्यावर आहे,एकदिवसीय मालिका बांगलादेश टीमने जिंकली. बांगलादेशविरुद्ध केएल राहूलचं (KL Rahul) फॉर्म खराब राहिला आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेपासून त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्यावर आतापर्यंत अनेकदा टीका केली आहे. खराब फॉर्म असताना सुध्दा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने केएल राहूलला नेतृत्व करण्याची संधी दिल्यामुळे अनेकांनी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केएल राहूलच्या जागी या तीन खेळाडूंना टीममध्ये संधी मिळाली असती.
पृथ्वी शॉ
पृथ्वी शॉने आतापर्यंत टीम इंडियासाठी चांगली खेळी केली आहे. त्याचबरोबर सध्या तो चांगली फॉर्ममध्ये आहे. पंरतु त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळत नसल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे खराब फॉर्ममध्ये असताना केएल राहूलवरती मॅनेजमेंट इतका का विश्वास दाखवत आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सरफराज खान
सरफराज खानने आतापर्यंत अनेकदा टीम इंडियासाठी चांगली खेळी केली आहे. त्यामुळे त्याला सुध्दा संधी मिळणं अपेक्षित होतं. परंतु सरफराज खानला सुद्धा मॅनेजमेंट टीमने दुर्लक्षित केल्याचं पाहायला मिळालं.
मयंक अग्रवाल
मयंक अग्रवाल या खेळाडूने परदेशात टीम इंडियासाठी कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. तरीही बांगलादेश दौऱ्यात त्याचं नाव वगळण्यात आलं.