IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये धोनीने केले महत्त्वाचे बदल, या अनुभवी खेळाडूचं स्थान कायम

| Updated on: Nov 15, 2022 | 11:37 AM

मागच्यावर्षी रविंद्र जाडेजाकडे कर्णधारपद देण्यात आलं होतं

IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये धोनीने केले महत्त्वाचे बदल, या अनुभवी खेळाडूचं स्थान कायम
IPL2023
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 (IPL 2023) ला आतापासून सुरुवात झाली आहे. आज सायंकाळपर्यंत कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये असेल हे जाहीर होणार आहे. टीमची फ्रेंचाइज़ी 15 खेळाडूंची लिस्ट बीसीसीआयला (BCCI) आज देणार आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जच्या टीमबाबत (CSK Team) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) या खेळाडूला टीमने कर्णधार पदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि निवड समिती शेवटच्या क्षणापर्यंत टीममध्ये बदल करण्याची शक्यता आहे. सीईओ काशी विश्वनाथन यांचं असं म्हणणं आहे की, चेन्नई सुपर किंग्ज मोठे नाव असलेल्या कोणत्याही खेळाडूला सोडणार नाही.

क्रिकबजशी बोलत असताना काशी विश्वनाथ म्हणाले की, आम्ही कोणत्याही मोठ्या खेळाडूला सोडणार नाही. आम्हाला जसं समजलं की, जाडेजा टीममध्ये खेळण्यासाठी फिट आहे, त्याला आम्ही तात्काळ कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या मोसमात त्याच्या आणि फ्रँचायझीमध्ये काही मतभेद झाले होते. पण यावर्षी तो पुन्हा चेन्नई सुपर किंग्जकडून मैदानात खेळताना दिसणार आहे.

मागच्यावर्षी रविंद्र जाडेजाकडे कर्णधारपद देण्यात आलं होतं. जाडेजाच्या कर्णधारपदाच्या काळात टीमने 14 मॅचपैकी फक्त 4 मॅच जिंकल्या. आता पुन्हा जाडेजाला चेन्नई सुपर किंग्स कर्णधार पदं देण्यात येणार आहे. यावेळी तो किती यशस्वी होतोय हे पाहावं लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

क्रिस जॉर्डन, चोटिल एडम मिल्ने, रॉबिन उथप्पा, नारायण जगदीशन,मिचेल सेंटनर या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्ज कायम करण्याची शक्यता आहे.