तापाने फणफणली तरी बॅट तळपली! कर्णधार हरमनप्रीत कौरची उपांत्य फेरीत ‘कॅप्टन इनिंग’, पण..
हरमनप्रीत कौरनं कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 173 धावांचं आव्हन गाठण्यासाठी जबरदस्त खेळी केली. तिने 34 चेंडूत 52 धावा केल्या.
मुंबई : टी 20 वुमन्स वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरची बॅट चांगलीच तळपली. सामना सुरु होण्यापूर्वी खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह होतं. पण ती मैदानात उतरली आणि क्रीडाप्रेमींनी सुटकेचा निश्वास सोडला. हरमनप्रीत कौरनं कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 173 धावांचं आव्हन गाठण्यासाठी जबरदस्त खेळी केली. तिने 34 चेंडूत 52 धावा केल्या. हरमनप्रीत कौरनं 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. मात्र धावचीत होऊन तंबूत परतली. पण तिची कॅप्टन इनिंग क्रीडाप्रेमींच्या चांगलीच लक्षात राहिली. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर तिने मोर्चा सांभाळला. पण तिची खेळी व्यर्थ गेली. टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारताला पराभवाची धुळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताचा डाव
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. शफाली वर्मा या सामन्यात अपयशी ठरली. 9 या धावसंख्येवर आता पायचीत होत तंबूत परतली. त्यानंतर स्मृती मंधाना देखील अवघ्या दोन धावा करून बाद झाली. त्यानंतर यास्तिका भाटिका धावचीत झाल्याने तिच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला. त्यानंतर चौथ्या गड्यासाठी जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरनं डाव सावरला. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिक्स चुकीचा फटका 43 या धावसंख्येवर परतली. त्यानंतर हरमनप्रीत कौरची खेळी सुरुच होती. पण धावचीत झाल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा मावळल्या. दीप्ती शर्मानं डाव सावरला खरा पण तिलाही स्नेह राण , राधा यादव यांची साथ मिळाली नाही. अखेर हा सामना भारताने 5 धावांनी गमावला.
Captain @ImHarmanpreet leading from the front ??
Brings up a brilliant FIFTY off 32 deliveries.
Live – https://t.co/fVVsNjFbjU #INDvAUS #T20WorldCup pic.twitter.com/HD3YFhvhxy
— BCCI Women (@BCCIWomen) February 23, 2023
ऑस्ट्रेलियाचा डाव
एलिसा हिली आणि बेथ मूनी या जोडीनं संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 52 धावांची आश्वासक भागीदारी केली. एलिसा हिली बाद झाल्यानंतर मूनी आणि मेग लॅनिंगनं डाव सावरला. दोघांची संघाची धावसंख्या 88 पर्यंत नेली. बेथ मूनी तंबूत 54 धावा करून परतली. त्यानंल्यानंतर लॅनिंगनं आपली खेळी सुरुच ठेवली. तिसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. गार्डनर बाद झाल्यानंतर मेग लॅनिंग आणि ग्रेस हॅरिस जोडी फार काही करू शकली नाही. हॅरीस शिखा पांडेच्या गोलंदाजीवर 7 धावा करून बाद झाली. त्यानंतर गोलंदाजांना मेग लॅनिंग आणि एलिसे पेरी ही जोडी फोडता आली नाही. रेणुका सिंगने सर्वात महागडं षटक टाकलं. तिने 4 षटकात 41 धावा दिल्या. तिला एकही गडी बाद करता आला नाही. शिखा पाडे (2), राधा यादव 1 आणि दीप्ती शर्मानं 1 गडी बाद केला. तर स्नेह राणाला एकही गडी बाद करता आला नाही.
दोन्ही संघांची प्लेईंग 11
Australia Playing 11 : मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.
Team India Playing 11 : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.