मुंबई : टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ अर्थात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून (India tour of Australia 2020) वगळण्यात आले आहे. गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने रोहित शर्मा आयपीएलमधील चार सामने खेळला नव्हता. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असावी, असे तर्क काहींनी लावले. मात्र मंगळवारी (03 नोव्हेंबर) आयपीएलच्या (IPL) साखळी फेरीतील शेवटचा सामना (मुंबई विरुद्ध हैदराबाद) खेळण्यासाठी रोहित मैदानावर उतरल्याने रोहितची दुखापत गंभीर नसून तो पूर्णपणे बरा झाल्याचे स्पष्ट झाले, तरीदेखील रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड का झाली नाही? असा सवाल चाहते उपस्थित करु लागले आहेत. (CBI inquiry on Rohit Sharma’s injury, fans slams BCCI)
रोहितला भारतीय संघात स्थान का देण्यात आलं नाही, यावरुन भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर, ‘कर्नल’ दिलीप वेंगसरकर, माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग यांनीदेखील सवाल उपस्थित केले आहेत. त्यातच हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदानावर उतरुन रोहितने आपण फिट असल्याची पावती दिली आहे. त्यामुळे बीसीसीआयमध्ये रोहितबाबत राजकारण सुरु आहे का? असा सवाल नेटीझन्स उपस्थित करत आहेत. रोहितच्या एका चाहत्याने ट्विटरवर रोहितच्या दुखापतीची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे.
There should be a separate CBI enquiry on Rohit Sharma injury ? #BCCI #MIvsSRH #rohit #RohitSharma
— ajit soutadekar (@ajit_soutadekar) November 3, 2020
@BCCI now how come @ImRo45 is playing? Either you should come out with a clarity regarding his fitness or omission (really)or you should discuss with @mipaltan regarding his match fitness if he is indeed injured since he is our main bat and future captain across all the 3 formats
— Joy Humanitarian (@JoyashisB) November 4, 2020
Rohit Sharma was not selected in Team India squad for Australia tour, but today he is captaining and playing for #MI ? Is there any issue with selection committee of #BCCI #Rohit #RohitSharma #MIvsSRH #Dream11Team #IPL2020
— @®üπ ®j (@rj_aru) November 3, 2020
@BCCI @SGanguly99 @mipaltan who is culprit here to spoil career of Rohit Sharma…@bcci is playing in the hand of few people… If a player is fit enough to play for club in a BCCI tournament only but not fit enough to play for country after 20 days…what a irony.. politics pic.twitter.com/Beg3jdjqMj
— Vineet jain (@vinjaica) November 4, 2020
रोहितच्या भारतीय संघातील निवडीबाबत सौरव गांगुली काय म्हणाला?
“रोहित नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार. रोहित शर्मा आणि इशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. इशांत शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी दिली नाही. मात्र तरीही तो कसोटी मालिकेत खेळू शकतो. तसेच रोहितला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पाहायचेय. रोहित दुखापतीतून सावरल्यास, निवड समिती रोहितबाबत नक्कीच सकारात्मक विचार करेल, असं गांगुली म्हणाला.
संबंधित बातम्या
रोहित शर्माने पुनरागमनाची घाई करु नये, रवी शास्त्री यांचा सल्ला
IPL 2020, MI vs DC : रोहितची लय बिघडू शकते, आम्ही त्याचा फायदा उठवू : शिखर धवन
पाकिस्तानी खेळाडूंनाही IPL खेळू द्या; वसीम अक्रमची मागणी
India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर
(CBI inquiry on Rohit Sharma’s injury, fans slams BCCI)