पतीचे नाव काढले, अनफॉलो केलं अन् एकमेकांचे फोटोही डिलीट; युजवेंद्र-धनश्रीचा खरंच घटस्फोट?
प्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी उधाण आलं आहे. एवढच नाही तर, जवळच्या सूत्रांनी त्यांच्या घटस्फोटाची पुष्टी केली असून, या जोडीच्या विभक्त होण्यामागे नेमके कारण काय सांगितलं आहे?
बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या नात्यांबद्दल चर्चा आहे. अनेकांचे घटस्फोट होत असल्याच्या चर्चा होतात तसच काही क्रिकेटरांच्या बाबतीतही या घटना घडताना दिसत आहेत. ज्यात आता प्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री या जाडीचीही घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होताना दिसतेंय.
दोघांनीही केलं एकमेकांना अनफॉलो
प्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी अभिनेत्री कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. याबद्दलच्या अनेक गोष्टी समोरही येत आहेत. त्यातच आता या जोडीबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. या अपडेटमुळे यां दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
युजवेंद्र आणि धनश्री यांच्यात खरंच बिनसलं असल्याचं दाखवणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. जसं की दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याचं दिसत आहे. एवढेच नाही तर या युजवेंद्रने पत्नी धनश्रीसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. तर धनश्रीनेही युजवेंद्रला अनफॉलो केलं आहे. मात्र तिने दोघांचे फोटो डिलीट केलेले नाहीत.
जोडीची एक अपडेट समोर आली आहे.
अभिनेत्री आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि तिचा क्रिकेटर पती युजवेंद्र चहल दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. 2023 मध्ये धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या नावामधून पती युजवेंद्रचे आडनाव ‘चहल’ हे काढून टाकले होते. त्यानंतरच त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना वेग आल होता. आणि आता दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्याने ते आता खरंच घटस्फोट घेणार आहेत का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या आहेत
या जोडीच्या जवळच्या सूत्रांनी एका मुलाखती दर आहे. त्यांच्या विभक्त होण्यामागची नेमकी कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत, परंतु हे स्पष्ट आम्यान सांगतिले की, घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या आहेत. घटस्फोट अपरिहार्य आहे, आणि तो अधिकृत होण्याआधी फक्त काही काळ बाकीहे की या जोडप्याने वेगळे जीवन जगण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं आहे. एवढचं नाही तर युजवेंद्रने “नवीन आयुष्य सुरू होत आहे” असं कॅप्शन असलेली स्टोरी इंस्टाग्रामवर स्टोरीही शेअर केली आहे.
View this post on Instagram
11 डिसेंबर 2020 रोजी लग्न केलं होतं.
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचे 11 डिसेंबर 2020 रोजी लग्न झाले. झलक दिखला जा 11 मध्ये असताना, कोरिओग्राफर धनश्रीने त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती. ती म्हणाली, “लॉकडाऊनच्या काळात एकही सामने होत नव्हते आणि सर्व क्रिकेटर्स घरी बसून निराश होत होते. त्याच दरम्यान, एके दिवशी युजीने ठरवले की त्याला डान्स शिकायचा आहे.
डान्स शिकण्यासाठी त्याने सोशल मीडियावर माझ्या डान्सचे व्हिडिओ पाहिले आणि त्यावेळी त्याने माझ्याशी संपर्क साधला आणि माही त्याला शिकवायला तयार झाले.” असे सांगताना तिचे आणि युजवेंद्र प्रेम कसं जमलं हे याचा किस्सा सांगितला आहे. दोघांचं प्रेम जमल्यानंतर त्यांनी पुढे लग्न करायचं ठरवलं . मात्र आता त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांनी सर्वांच धक्का बसला आहे.