Virat Kohli : पाकिस्तानच्या धुलाईनंतर विराटचा खास व्यक्तीला व्हिडीओ कॉल
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुबईतील झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय मिळवला. 96 धावांवर खेळणाऱ्या विराट कोहलीन खणखणीत चौकार मारत त्याचे शतकच पूर्ण केलं नाही तर त्यासोबत भारताला विजयही मिळवून दिला. त्याच्या या खेळीमुळे सर्वजण त्याचे कौतुक करत असतानाच विराटने मैदानातूनच एका खास व्यक्तीला व्हिडीओ कॉल केला.

गेल्या अनेक दिवनसांपासून विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या, मात्र त्याच विराटने दुबईतील स्टेडिअममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात असा खेळ केला की सगळ्यांचीच बोलती बंद झाली. फॉर्ममध्ये आलेल्या विराटने शानदार शतक तर झळकावलंच पण त्यासोबत भारताला या स्पर्धेतला दुसरा विजयही मिळवून दिला. त्याच्या खेळीचं सगळ्यांनीच भरभरून कौतुक केलं, पण त्याच्यानंतर काय झालं ? मैदानावर खेळताना विराटने खेळाडू म्हणून त्याचं कर्तव्य पूर्ण केलं. पण टीमला विजय मिळवून दिल्यानंतर त्याने जे काम केलं ते पाहून जनसामान्यही खुश झाले. त्याने पती म्हणूनही कर्तव्य पार पाडलं. पाकिस्तानची धुलाई केल्यानंतर विराट काही वेळातच तो पतीच्या भूमिकेत शिरला आणि मैदानातील तेच परिचित चित्र पुन्हा दिसल. विराटने थेट मैदानातूनच एका खास व्यक्तीला व्हिडीओ कॉल केला, ती म्हणजे त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला .
पाकिस्तानची धुलाई करून अनुष्काला व्हिडीओ कॉल
आता विराट आणि अनुष्का यांच्यात व्हिडिओ कॉलवर काय बोलणं झालं हे तर समजू शकलं नाही. पण, पाकिस्तानविरुद्धच्या खेळीचा आनंद विराटने पत्नी अनुष्कासोबत शेअर केला असेल हे निश्चित. त्याने शतकी खेळीचा आणि विजयाचा आनंद लेक वामिका आणि मुलगा अकाय यांच्यासोबत शेअर केला असेल. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शेवटचा चौकार लगावत शतक तर पूर्ण केलंच पण भारताला विजयही मिळवून दिला.
विराटची उत्तम खेळी
पाकिस्तानविरुद्धचा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने सांगितले की मैदानावर त्याची भूमिका काय होती? तो म्हणाला की, रोहित बाद झाल्यानंतर मधली षटके सांभाळण्याचं त्याचं काम होतं. मात्र विराटने ती भूमिका केवळ सुंदररित्या निभवली नाही तर 466 दिवसांनंतर शतकाचा दुष्काळ संपवून भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची व्यवस्थाही केली.
पाकिस्तानविरुद्धचं हे शतक सामान्य नाही
दुबईत पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली एका टोकाला उभा होता. या काळात त्याची श्रेयस अय्यरसोबतची भागीदारी जबरदस्त होती. विराट कोहली शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 111 चेंडूंचा सामना करत पूर्ण 100 धावा केल्या. वनडे करिअरमध्ये हे त्याचं 51वं शतक होतं. तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात त्याच्या बॅटने झळकावलेले हे पहिले शतक ठरले. या शतकामुळे विराट कोहलीही भारताच्या विजयाचा हिरो ठरला. अर्थात तो सामनावीर म्हणून निवडला गेला, हा त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळालेला दुसरा पुरस्कार आहे. यापूर्वी 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो सामनावीर म्हणून निवडला गेला होता.