Video | ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीचा 114 मीटर लांब गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ

अवघ्या काही दिवसांनी आयपीएलच्या 14 व्या मोसमाला सुरुवात होत आहे. त्याआधी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नेट्समध्ये सराव करताना (Mahendra Singh Dhoni) 114 मीटर लांब गगनचुंबी सिक्सर (hit a six of 114 meters) फटकावला आहे.

Video | 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीचा 114 मीटर लांब गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ
अवघ्या काही दिवसांनी आयपीएलच्या 14 व्या मोसमाला सुरुवात होत आहे. त्याआधी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नेट्समध्ये सराव करताना (Mahendra Singh Dhoni) 114 मीटर लांब गगनचुंबी सिक्सर (hit a six of 114 meters) फटकावला आहे.
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 8:04 AM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमाला 9 एप्रिलपासून (IPL 2021) सुरुवात होणार आहे. तब्बल 2 वर्षांनंतर आयपीएलचं भारतात आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या पर्वासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये औतुसक्याचं वातावरण आहे. दरम्यान या पर्वासाठी प्रत्येक संघाने आपल्या परीने सराव सुरु केला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार ‘कॅप्टन कुल’ अर्थात महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) नेट्समध्ये जोरदार सराव करत आहे. या सरावादरम्यान धोनीने तब्बल 114 मीटर लांब गगनचुंबी षटकार खेचला आहे. याचा व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्जसच्या ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे. (Chennai Super Kings Captain Mahendra Singh Dhoni hit a six of 114 meters)

हा एकूण 10 सेकंदाचा व्हिडीओ आहे. यामध्ये धोनी नेट्समध्ये सिक्स मारण्याचा सराव करताना दिसत आहे. यामध्ये धोनी जोरदार सिक्स मारताना दिसत आहे. या व्हिडीओवरुन धोनी 14 व्या मोसमासाठी सज्ज असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे चेन्नईच्या समर्थकांना धोनीकडून या हंगामात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

चेन्नईची गेल्या मोसमात निराशाजनक कामगिरी

चेन्नईसाठी आयपीएलचा 13 वा मोसम निराशाजनक ठरला. सुरेश रैना आणि हरभजन सिंह या महत्वाच्या 2 खेळाडूंनी ऐनवेळेस माघार घेतली. तर कर्णधार महेंद्र सिंह धोनी अपयशी ठरला. धोनीला त्या मोसमात धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. चेन्नने पहिल्या 12 मोसमात दरवेळेस प्लेऑफमध्ये (टॉप 4) प्रवेश मिळवला होता. मात्र गेल्या मोसमात चेन्नईचे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते. यामुळे चेन्नई या मोसमात जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

धोनी आयपीएलमधील यशस्वी कर्णधार

गेला 13 व्या मोसम चेन्नईसाठी खराब ठरला. मात्र धोनीने चेन्नईला 3 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. धोनी आयपीएलमध्ये रोहित शर्मानंतरचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. तसेच धोनी आयपीएलमध्ये यशस्वी फलंदाज राहिला आहे.

चेन्नईची टीम

महेंद्रसिंह धोनी, इमरान ताहीर, लुंगी एन्गिडी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, नारायण जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, फॅफ डु प्‍लेसीस, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवुड, सॅम करन, कर्ण शर्मा आणि रॉबिन उथप्‍पा, के गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा आणि सी हरि निशांत.

संबंधित बातम्या :

IPL Chennai Super Kings Team 2021 | धोनीच्या टीममध्ये ‘हे’ 2 अष्टपैलू खेळाडू, चेन्नई पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज, पाहा पूर्ण टीम

IPL 2021 | आयपीएलच्या14 व्या मोसमाआधी धोनीच्या चेन्नईला मोठा झटका, दिसणार नाही ‘हे’ नाव

VIDEO | 14 व्या पर्वासाठी ‘मिस्टर आयपीएल’ सज्ज, मैदानात जोरदार सराव

(Chennai Super Kings Captain Mahendra Singh Dhoni hit a six of 114 meters)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.