मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) टीमचं नेतृत्व कोण करणार याकडे अनेकांचं लक्ष होतं. कारण गेल्यावर्षी रविंद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) कर्णधार पद देण्यात आलं होतं. परंतु टीमची खराब कामगिरी पाहता, त्यांच्याकडून आयपीएल सुरु असताना कर्णधार पद काढून घेण्यात आलं. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) कर्णधार पद देण्यात आलं होतं. केएस विश्वनाथन यांनी चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार कोण असेल हे स्पष्ट केलं आहे.
यावर्षी आयपीएलचा सोळावा सीजन होणार आहे, त्याची तयारी आतापासून सुरु झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सने काही जुन्या खेळाडूंना टीममध्ये कायम ठेवलं आहे. तर काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स या टीमचं कर्णधार पद कोणाला मिळणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होती. पण पुन्हा महेंद्रसिंग धोनीला कर्णधार पद देण्यात आलं आहे.
टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याने जोपर्यंत धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या टीममध्ये आहे. तोपर्यंत कोणताही खेळाडू कर्णधार होऊ शकत नाही असं म्हटलं आहे.
चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवलेले खेळाडू
एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुकेश चौधरी, मशिन चौधरी. , दीपक चहर , प्रशांत सोळंकी , महेश थिकना
कायम न ठेवलेले खेळाडू: ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्ने, हरी निशांत, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीसन