Chennai Super kings : चेन्नई सुपर किंग्जचा चॅम्पियन अडकला लग्नबंधनात, थाटात पार पडला विवाहसोहळा

| Updated on: Dec 22, 2023 | 11:12 AM

बरेच सेलिब्रिटी तसेच खेळाडू सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. आता आणखी एक खेळाडू विवाहबंधनात अडकला आहे. आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्समधील आघाडीचा खेळाडू, भल्याभल्यांची दांडी उडवणारा, दिग्गज फलंदाजांची विकेट घेणारा गोलंदाज तुषार देशपांडे हा विवाहबंधनात अडकला.

Chennai Super kings :  चेन्नई सुपर किंग्जचा चॅम्पियन अडकला लग्नबंधनात, थाटात पार पडला विवाहसोहळा
Follow us on

कल्याण | 22 डिसेंबर 2023 : सध्या लग्नसराईचा मौसम सुरू आहे. बरेच सेलिब्रिटी तसेच खेळाडू सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. आता आणखी एक खेळाडू विवाहबंधनात अडकला आहे. आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्समधील आघाडीचा खेळाडू, भल्याभल्यांची दांडी उडवणारा, दिग्गज फलंदाजांची विकेट घेणारा गोलंदाज तुषार देशपांडे हा विवाहबंधनात अडकला. अनेक फलंदाजांना सापळ्यात अडकवून त्यांची दांडी गुल करणाऱ्या तुषारला नभा गड्डमवारने क्लीन बोल्ड केले. कल्याणमधील एका हॉलमध्ये काल त्यांचा विवाह संपन्न झाला. या लग्नसोहळ्यासाठी आणि नवविवाहीत दांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी आयपीएलमधील आणि मुंबई संघाकडून एकत्र खेळणारे प्रशांत सोलंकी,धवल कुलकर्णी, भावीन ठक्कर, शिवम दुबे या स्टार क्रिकेटपटूंनी या लग्नाला हजेरी लावली.

थाटात पडला लग्नसमारंभ

चेन्नई सुपर किंग्जचा चॅम्पियन गोलंदाज तुषार देशपांडे विवाह बंधनात अडकला आहे. कल्याणच्या एका हॉलमध्ये हा लग्न सोहळा संपन्न झाला . अनेक दिग्गज फलंदाजांची विकेट काढणाऱ्या तुषार देशपांडेला नभा गड्डमवारडने क्लीन बोल्ड केलं.नभा गड्डमवार ही त्याची कॉलेजपासूनची मैत्रीण आहे. काही दिवसांपूर्वीचदोघांचा साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.

अखेर काल, 21 डिसेंबर रोजी तुषार आणि नभा यांनी एकमेकांसोबत सप्तपदी घेतली आणि लग्नबंधनात अडकले. या विवाह सोहळ्याला त्याचे क्रिकेटचे मार्गदर्शक, मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या सर्वांनी वधू-वरांस शुभाशीर्वाद दिले . तर आयपीएल आणि मुंबई संघाकडून एकत्र खेळणाऱ्या प्रशांत सोलंकी,धवल कुलकर्णी, भावीन ठक्कर, शिवम दुबे या स्टार क्रिकेटपटूंनी या लग्नाला हजेरी लावली होती.

तुषार देशपांडे हा आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व करतो. आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नईचा संघ चॅम्पियन बनला होता. या हंगामात तुषारने दमदार गोलंदाजी केली होती. यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याचा नभासोबत साखरपुडा झाला. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लग्नाची एकच चर्चा रंगली होती .

आयपीएल 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी..

आयपीएल 2023 स्पर्धेत तुषार देशपांडेने दमदार कामगिरी केली आहे. एमएस धोनीने दिलेली जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली आहे. त्याने या स्पर्धेतील 16 सामन्यांमध्ये 21 गडी बाद केले आहेत. यादरम्यान 45 धावांमध्ये ३ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.