दिल्ली : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात 263 धावा केल्या आणि भारताला 262 धावांवर रोखत एका धावेची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया 1 बाद 61 अशी धावसंख्या आहे. असं असलं तरी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. यामुळे हा दिवस सोशल मीडियावर चांगलाच गाजला. केएल राहुलचं झटपट बाद होणं असो, रोहित शर्माला नाथन लायनचा बॉल न कळणं असो की विराट कोहलीला बाद देणं असो यामुळे हा दिवस चर्चेत राहिला.पण यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो चेतेश्वर पुजाराचा..चेतेश्वर पुजाराची हा 100 वा कसोटी सामना आहे. 100 कसोटी सामने खेळणार पुजारा हा 13 वा भारतीय खेळाडू आहे. या सामन्यात नकोसा विक्रम करत या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत बसला. पुजारा या सामन्यात एकूण सात चेंडू करत शुन्यावर बाद झाला.दिलीप वेंगसरकर यांच्यानंतर नकोसा विक्रम त्याच्या वाटेला आला.
100 व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाल्याने दिलीप वेंगसरकर, एलन बॉर्डर, मार्क टेलर, स्टीफन फ्लेमिंग, अॅलेस्टर कूक आणि ब्रेंडन मॅकलम यांच्या पंगतीत बसला आहे. या सर्वजण 100 व्या कसोटी सामन्यात शुन्यावर बाद झाले आहेत. केएल राहुल बाद झाल्यानंतर पुजारा मैदानात आला.पण तो सेट होईपर्यंत कर्णधार रोहित शर्मा तंबूत परतला. त्यामुळे विकेट वाचवण्याच्या नादात पुजाराने सावध खेळीला प्राधान्य दिलं. पण सात चेंडू खेळत नाथन लायनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
खरं तर पुजारा दोन चेंडू खेळूनच बाद झाला असता. नाथन लायनच्या गोलंदाजीवर पायचीतची अपील करण्यात आली होती. मात्र पंचांना आउट नसल्याचं सांगितलं. त्यात ऑस्ट्रेलियाचे दोन रिव्ह्यूही संपले होते. त्यामुळे पुजाराला खऱ्या अर्थाने जीवदान मिळालं होतं. पण अखेर त्याच्याच गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.
दिलीप वेंगसरकर मुंबईत न्यूझीलंड विरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळले होते. 1988 साली हा सामना झाला.वेंगसरकर यांनी पहिल्या डावात 25 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये ते खातही उघडू शकले नाहीत.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन .