BBL 2020 : क्रिकेट चाहत्यांमध्ये गोंधळाचं वातावरण, दिग्गज समालोचकाचं बीग बॅश लीगच्या नव्या नियमांवर आक्षेप
बीग बॅश स्पर्धेच्या 10 व्या पर्वाला 10 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.
कॅनबेरा : आयपीएलचा 13 वा मोसम संपला आहे. त्यानंतर आता बीग बॅश लीगच्या(Big Bash League) 10 व्या मोसमाचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. 10 डिसेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत रंगत आणण्यासाठी स्पर्धेच्या आयोजकांकडून 3 नवे नियम आणले आहेत. मात्र या नियमांवरुन दिग्गज समालोचकाने आक्षेप घेतला आहे. मराठमोळे समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी या 3 नव्या नियमांबाबत आक्षेप घेतला आहे. तसेच या नव्या नियमांमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रामावस्था आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. भोगले यांनी ट्विटद्वारे आपला आक्षेप नोंदवला आहे. commentator harsha bhogle objects to 3 new rules in big bash league 2020
भोगले काय म्हणाले?
बीग बॅश लीगमधील 3 नव्या निर्णयांमुळे क्रिकेट चाहते गोंधळले आहेत. या निर्णयामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मी नुकताच आयपीएल सारखी यशस्वी स्पर्धा पार पाडून आलो आहे. ही स्पर्धा एक मजबूत आणि प्रसिद्ध स्वरुपाची आहे, असं भोगले यांनी ट्विट केलं आहे. बीग बॅश लीगच्या या आगामी 10 व्या मोसमासाठी नवे नियम केले गेले. या निर्णयाचं काही जणांकडून स्वागत केलं जात आहे. तर काही जणांना हा निर्णय पटलेला नाहीये. तसेच काही चाहत्यांचा या नव्या निर्णयामुळे गोंधळ झाला आहे.
Bit perplexed by the changes to the @BBL. You add gimmicks if a product is in poor health. And once you start, two years later, you need more gimmicks. It is confusing to audiences. I am just back from a spectacularly successful @IPL and can confirm the format is in robust health
— Harsha Bhogle (@bhogleharsha) November 16, 2020
काय आहेत नियम?
2 पावर प्ले
या स्पर्धेत नव्या नियमांनुसार 2 पावर प्ले असणार आहेत. सर्वसाधारणपणे पॉवर प्ले सुरुवातीच्या 6 ओव्हरपर्यंत असतो. सामन्याच्या पहिल्या पावर प्लेमध्ये 2 ओव्हरने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्येच पावर प्ले असणार आहे. तर त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या संघाला 11 व्या ओव्हरनंतर कधीही पॉवरप्लेच्या 2 ओव्हरचा वापर करता येणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक संघाला फायदा होणार आहे.
Entertainment levels ?
“The Power Surge, X-Factor and Bash Boost prioritise high scoring, exciting cricket, introduce new strategic angles and ensure there’s always something to play for throughout the entire match," – Head of BBL, Alistair Dobson #BBL10 pic.twitter.com/Nacna2XHw9
— KFC Big Bash League (@BBL) November 15, 2020
एक्स फॅक्टर खेळाडू
सामन्याच्या काही तासांआधी प्लेइंग इलेव्हन म्हणजेच अंतिम 11 खेळाडू ठरवले जातात. या खेळाडूंनाच मैदानात विरोधी संघाविरोधात खेळता येतं. मात्र नव्या नियमानुसार 12 आणि 13 क्रमांकाच्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळणार आहे. सामन्याच्या 10 ओव्हरनंतर प्लेइंग इलेव्हनमधील एका खेळाडूच्या बदलीत प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नसलेल्या खेळाडूला संघात स्थान देता येणार आहे. मात्र यासाठी काही अटी आहेत. ज्या खेळाडूला बदली करण्यात येणार आहे, त्या खेळाडूने त्या सामन्यात फलंदाजी केलेली नसावी. किंवा बदली करण्यात येणारा खेळाडू जर गोलंदाज असेल तर त्याने त्या सामन्यात 1 ओव्हरपेक्षा जास्त गोलंदाजी केलेली नसावी. अशा खेळाडूंचीच बदली करुन दुसऱ्या खेळाडूंना संघात समाविष्ट करता येऊ शकणार आहे.
अतिरिक्त बोनस पॉइंट
नव्या नियमांनुसार एका सामन्यासाठी 4 पॉइंट्स असणार आहेत. यापैकी 3 पॉइंट्स हे विजयी टीमला मिळणार आहेत. तर उर्वरित 1 पॉइंट हा बोनस स्वरुपात असणार आहे. 10 ओव्हरनंतर ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल, त्या संघाला हा बोनस पॉइंट मिळणार आहे.
एकूण 68 दिवस चालणार स्पर्धा
बीग बॅश लीगचं पर्व एकूण 68 दिवस चालणार आहे. या स्पर्धेला 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर शेवट 6 फेब्रुवारीला होणार आहे. या नव्या बदलांमुळे क्रिकेट रसिकांना नक्कीच आणखी रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत, याबद्दल अजिबात शंका नाही.
आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया क्रिकेटने बीग बॅश लीग स्पर्धेंच 2011 मध्ये पहिल्यांदा आयोजन केलं होतं. तेव्हापासून ही स्पर्धा खेळवण्यात येतेय. या स्पर्धेत आयपीएलप्रमाणे एकूण 8 संघांचा समावेश असतो. अॅडलेड स्ट्रायकर्स, ब्रिस्बेन हिट, होबार्ट हरिकेन्स, मेलबर्न रेनेगेड्स, मेलबर्न स्टार्स, पर्थ स्क्रॉचर्स, सिडनी सिक्सर्स, सिडनी थंडर असे 8 संघ या या स्पर्धेत खेळतात. पर्थ स्क्रॉचर्सने सर्वाधिक 3 वेळा या स्पर्धेतचं जेतेपद पटकावलं आहे. दरवर्षी डिसेंबर-फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धेंचं आयोजन करण्यात येतं.
संबंधित बातम्या :
BBL 2020 | 2 पॉवर प्ले, बोनस पॉइंट्स, T20 मधील तीन नव्या नियमांनी रंगत
commentator harsha bhogle objects to 3 new rules in big bash league 2020