Commonwealth Games 2022 Live Updates, Day 1 : आज महिला क्रिकेट संघाला इतिहास रचण्याची संधी, संघासाठी विराट कोहलीचं खास ट्विट

| Updated on: Jul 29, 2022 | 6:56 PM

CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Cricket Match Updates : आज भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना रंगणार आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

Commonwealth Games 2022 Live Updates, Day 1 : आज महिला क्रिकेट संघाला इतिहास रचण्याची संधी, संघासाठी विराट कोहलीचं खास ट्विट
CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Image Credit source: social

Commonwealth Games 2022 Updates : बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल स्पर्धेला (Commonwealth Games 2022) आजपासून सुरुवात होत आहे. यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे क्रिकेटचं पुनरागमन हे देखील आहे. 24 वर्षांनंतर क्रिकेट राष्ट्रकुल क्रीडा (CWG 2022) स्पर्धेत परतत आहे. तेही T20 स्वरूपात. प्रथमच महिला क्रिकेट राष्ट्रकुलचा एक भाग बनला आहे. त्याची सुरुवात धमाकेदारपणे होत आहे. आज भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध (CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Cricket Match) सामना रंगणार आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. CWG मध्ये महिला क्रिकेटचा प्रथमच प्रवेश म्हणजे इतिहास घडवण्याची संधी. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट मैदानाव आज हा सामना खेळवला जाईल. प्रत्येक खेळाचे अपडेट्स जाणून घ्या…

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 29 Jul 2022 05:51 PM (IST)

    अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

    अंधेरी पश्चिम येथे एका फिल्मच्या सेटवर आग लागली आहे, ही आग दुपारी 4.30 च्या सुमारास लागली होती, आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे,

    मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी आग लागली आहे, तो फिल्मचा सेट आहे, सध्या या आगीत कोणीही अडकल्याची माहिती नाही आहे, तसेच कोणीही जखमी झाले नाही.

    ही आग कशी लागली, आग कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक करत आहे.

  • 29 Jul 2022 03:00 PM (IST)

    Commonwealth Games 2022 Schedule : स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

    आज म्हणजेच 29 जुलैपासून राष्ट्रकुलच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक (Commonwealth Games 2022 Schedule) जाणून घ्या

    वेळापत्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  • 29 Jul 2022 02:50 PM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 : भारताला शेवटचा विजय सुमारे अडीच वर्षांपूर्वी

    भारताला शेवटचा विजय सुमारे अडीच वर्षांपूर्वी 2020 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात मिळाला होता.

    जेव्हा पूनम यादवच्या फिरकीच्या जोरावर भारतानं 17 धावांनी विजय मिळवला होता.

    ऑक्टोबर 2021 मध्ये दोन्ही संघांमधील शेवटचा सामना खेळला गेला होता.

    ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील 3 पैकी दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले

  • 29 Jul 2022 02:30 PM (IST)

    Commonwealth Games 2022 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहा

    राष्ट्रकुलमध्ये पुन्हा एकदा महिला क्रिकेटचा या खेळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

    हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असून आज त्यांचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

    हा सामना भारतीय वेळेनुसार 3.30 वाजता खेळवला जाईल. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 29 Jul 2022 02:20 PM (IST)

    CWG 2022 Table Tennis : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

    भारतीय महिलांच्या टेबल टेनिससमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे.

    मनिका बत्रा, श्रीजा अकुला, रीत आणि दिया या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देतील

  • 29 Jul 2022 02:13 PM (IST)

    Commonwealth Games 2022 Live Updates : लॉन बॉलचं अपडेट

    तान्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण ती त्यात यशस्वी होऊ शकली नाही आणि तिच्या प्रतिस्पर्ध्याने पुन्हा तिच्यावर आघाडी घेतली आहे. ती 16-6 अशी आघाडीवर आहे.

  • 29 Jul 2022 01:58 PM (IST)

    Commonwealth Games 2022 लॉन बॉल : भारतीय पुरुष संघ बॅकफूटवर

    लॉन बॉल या क्रीडाप्रकारात न्यूझीलंडने भारतीय पुरुष संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. न्यूझीलंड संघ एकतर्फी शैलीत खेळत असून सध्या 8-1 ने आघाडीवर आहे. येथून परत येण्यासाठी भारताला खूप मेहनत करावी लागणार आहे

  • 29 Jul 2022 01:23 PM (IST)

    Commonwealth Games 2022 Live : जलतरणातील भारताचा विक्रम अतिशय खराब

    जलतरणातही पहिल्या दिवशी भारतीय खेळाडू उतरून आपली ताकद दाखवतील.

    या खेळांमध्ये जलतरणातील भारताचा विक्रम अतिशय खराब राहिला आहे.

    यावेळी भारताने चार सदस्यीय संघ मैदानात उतरवला आहे.

    यावेळी भारत जलतरणात पदक जिंकण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.

  • 29 Jul 2022 01:10 PM (IST)

    Commonwealth Games 2022 Live : खेळाडूंकडून पदकांची आशा

    गेल्या वेळी गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर भारताने एकूण 66 पदके जिंकली होती त्यापैकी 25 सुवर्ण, 19 रौप्य आणि 20 कांस्य पदके होती. यावेळी भारताचे खेळाडू गेल्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.

  • 29 Jul 2022 01:05 PM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Updates : विराट कोहलीचा खास संदेश

  • 29 Jul 2022 01:00 PM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Cricket : भारताचे तरबेज खेळाडू कोणते, जाणून घ्या….

    भारताच्या खेळाडूंमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्माही आहेत. जेमिमा रॉड्रिग्ज, राजेश्वरी गायकवाड अशी नावे आहेत. तथापि, संघाला अष्टपैलू पूजा वस्त्राकरची उणीव भासणार आहे, जी कोरोना संसर्गामुळे अद्याप बर्मिंगहॅमला गेली नाही.

  • 29 Jul 2022 12:55 PM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 : ऑस्ट्रेलियाकडे उत्कृष्ट खेळाडू, जाणून घ्या…

    सध्याच्या T20 आणि एकदिवसीय विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडे अ‍ॅलिसा हिली, बेथ मुनी, कर्णधार मेग लॅनिंग, ताहलिया मॅकगार, मेगन शुट यासारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत.

  • 29 Jul 2022 12:50 PM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Cricket : शेवटचा विजय अडीच वर्षांपूर्वी

    भारताला शेवटचा विजय सुमारे अडीच वर्षांपूर्वी 2020 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात मिळाला होता

    पूनम यादवच्या फिरकीच्या जोरावर भारताने 17 धावांनी विजय मिळवला होता

    ऑक्टोबर 2021 मध्ये दोन्ही संघांमधील शेवटचा सामना खेळला गेला होता

    ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील 3 पैकी दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले

  • 29 Jul 2022 12:45 PM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Cricket Match Updates : भारतीय महिला संघ फॉर्ममध्ये

    हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने यापूर्वी चांगली कामगिरी करत श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. संघ चांगल्या फॉर्ममध्ये धावत आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियन संघाने आयर्लंड आणि पाकिस्तानसोबत तिरंगी मालिका जिंकली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत.हा सामना टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल.

  • 29 Jul 2022 12:40 PM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियातील सामना किती वाजता?

    आज म्हणजेच 29 जुलै रोजी एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे सामना खेळला जाईल.सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल.

  • 29 Jul 2022 12:35 PM (IST)

    Commonwealth Games 2022 : भारतीय महिलाखेळाडूंकडून अपेक्षा

    भारतीय महिला खेळाडूंकडून खूप आशा असतील. पीव्ही सिंधू या गेम्समध्ये प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्याला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मिश्र सांघिक स्पर्धेत सिंधूचे सुवर्णपदक असले तरी तिला एकेरी प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवायचे आहे. त्यांच्याशिवाय महिला विभागात लोव्हलिना बोरगोहेन, विनेश फोगट, निखत जरीन, साक्षी मलिक, हिमा दास, महिला हॉकी संघ, महिला क्रिकेट संघ यांच्याकडूनही पदकाची अपेक्षा आहे.

  • 29 Jul 2022 12:30 PM (IST)

    Commonwealth Games 2022 Opening Ceremony : कालच्या शानदार सोहळ्याचा व्हिडीओ

  • 29 Jul 2022 12:15 PM (IST)

    Commonwealth Games 2022 Opening Ceremony : मलालाने केलं खेळाडूंचं स्वागत

  • 29 Jul 2022 12:10 PM (IST)

    Commonwealth Games 2022 : कामगिरी चांगली होईल का?

    गेल्या वेळी गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यानंतर भारताने एकूण 66 पदके जिंकली होती त्यापैकी 25 सुवर्ण, 19 रौप्य आणि 20 कांस्य पदके होती. यावेळी भारताचे खेळाडू गेल्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.

  • 29 Jul 2022 12:10 PM (IST)

    Commonwealth Games 2022 Opening Ceremony राष्ट्रकुलच्या उद्घाटन सोहळ्यातील रोषणाई, पाहा Photos

  • 29 Jul 2022 12:05 PM (IST)

    CWG 2022 photo : राष्ट्रकुलच्या उद्घाटन सोहळ्यातील क्षण…

  • 29 Jul 2022 12:00 PM (IST)

    CWG 2022 photo : भव्य उद्घाटन सोहळा

    बर्मिंगहॅममध्ये एका रंगारंग कार्यक्रमानं राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात झाली. 30 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात बर्मिंगहॅम देशाचा गौरवशाली इतिहास दाखवण्यात आला.

    भव्य उद्घाटन सोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  • 29 Jul 2022 11:55 AM (IST)

    Commonwealth Games 2022 : मैदानात उतरण्यासाठी सज्ज

    विश्वविजेती सिंधू बर्मिंगहॅम येथे महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. गोल्ड कोस्ट आणि ग्लासगो येथे गेल्या दोन टप्प्यात तिने रौप्य आणि कांस्यपदके जिंकली होती. गोल्ड कोस्टमध्ये 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सिंधू ध्वजवाहक होती. तिला हा मान दुसऱ्यांना मिळाल्याने तिचाही उत्साह वाढला आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू पूर्ण जोमाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

  • 29 Jul 2022 11:50 AM (IST)

    Commonwealth Games 2022 सिंधुची कामगिरी कशी राहणार?

    सिंधूने यावर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपन या दोन सुपर 300 विजेतेपद पटकावले आहेत. तिला अव्वल खेळाडूंविरुद्ध चांगली कामगिरी करता येत नाही ही तिच्यासाठी चिंतेची बाब आहे. तिला अलीकडेच थायलंडच्या रत्चानोक इंथानॉन, चीनच्या चेन यू फेई आणि कोरियाच्या अन से विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. जर सातव्या मानांकित सिंधूने सुरुवातीच्या दोन फेऱ्या जिंकण्यात यश मिळवले तर तिला तिसऱ्या मानांकित अॅन से यंगचा सामना करावा लागेल, त्यांचा भारताविरुद्ध 5-0 असा शानदार रेकॉर्ड आहे.

  • 29 Jul 2022 11:45 AM (IST)

    CWG 2022 : 4 स्पर्धांमध्ये भारतासमोर कोणतेही आव्हान नाही

    भारत 3×3 बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल, नेट बॉल आणि रग्बी इव्हेंटमध्ये आव्हान देणार नाही. भारताने राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीत अनेक पदके जिंकली आहेत, पण यावेळी नेमबाजी हा या खेळांचा भाग नाही. त्यामुळे भारताच्या पदकतालिकेवरही परिणाम होईल.

  • 29 Jul 2022 11:40 AM (IST)

    Commonwealth Games 2022 Schedule : स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

    29 जुलैपासून भारतीय खेळाडू आपले आव्हान सादर करतील. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 181 सुवर्ण, 173 रौप्य, 149 कांस्य पदकांसह एकूण 503 पदके जिंकली आहेत. गेल्या 3 राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं 503 पैकी 231 पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. गेल्या वेळी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य अशी एकूण 66 पदके जिंकली होती. या कॉमनवेल्थमध्ये 215 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. इथे जाणून घ्या भारतीय खेळाडू मैदानात कधी उतरतील. किती वाजता सामने खेळले जातील. स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक (Commonwealth Games 2022 Schedule) जाणून घ्या

    वेळापत्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  • 29 Jul 2022 11:35 AM (IST)

    CWG 2022, Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तान 31 जुलै रोजी

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 31 जुलै रोजी होणार आहे, त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी भारत आणि बार्बाडोस यांच्यात सामना होणार आहे. टीम इंडियाला पुढील फेरी गाठण्यासाठी किमान दोन सामने जिंकावे लागतील.

  • 29 Jul 2022 11:30 AM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Cricket Match : पूजा वस्त्राकर सावरली नाही

    मेघनाचे संघात स्थान भरण्यासाठी पुरेसे पर्याय असले तरी संघाची खरी कमतरता अष्टपैलू पूजा वस्त्राकर असेल, जी अद्याप कोरोनामधून सावरलेली नाही. पूजा वस्त्राकर गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक फॉरमॅटमध्ये संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा महत्त्वाचा भाग म्हणून उदयास आली आहे. खालच्या ऑर्डरमध्ये मोठे फटके मारण्यासोबतच डाव सांभाळण्याची क्षमता तिच्याकडे आहे आणि ती तिच्या मध्यम गतीने विकेट्सही घेते.

  • 29 Jul 2022 11:25 AM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Cricket Match : एस मेघना आता बर्मिंगहॅममध्ये संघात सामील

    आता टीम इंडियाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. संसर्ग झालेल्या दोनपैकी एक खेळाडू या आजारातून बरा झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार फलंदाज एस मेघना आता बर्मिंगहॅममध्ये संघात सामील झाली आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये 24 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन झाले असून अशा प्रकारे महिला क्रिकेटचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. यावेळी सामने टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवले जातील आणि सामन्यांची सुरुवात भारतीय संघाकडून होईल. टीम इंडिया आज शुक्रवारी 29 जुलैला अ गटातील पहिल्या सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. एस मेघना या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण ती सध्या संघाशी संबंधित आहे आणि अशा परिस्थितीत, तिला सामन्यात फिट होण्यासाठी आणि तयारीसाठी थोडा वेळ लागेल.

  • 29 Jul 2022 11:20 AM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड चांगला नाही

    बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट मैदानाव आज हा सामना खेळवला जाईल. ग्रुप स्टेजमधील भारताचा हा पहिला आणि कदाचित सर्वात कठीण सामना आहे. साहजिकच भारताचे आव्हानही सोपे नसेल. याची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये पहिले कारण म्हणजे भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड चांगला नाही. मग आता जिंकलो तर टीम इंडियाला CWG मधील महिला क्रिकेटचा पहिला सामना जिंकण्याचा दर्जा मिळेल.

    सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • 29 Jul 2022 11:18 AM (IST)

    Commonwealth Games 2022 Opening Ceremony : उद्घाटन सोहळा पाहा

  • 29 Jul 2022 11:10 AM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Cricket Match : भारतीय संघ फायदा घेऊ शकतो

    अलीकडच्या काळात श्रीलंकेविरुद्ध सलग 6 सामने (तीन वनडे, तीन टी-20) खेळले आणि त्यापैकी 5 जिंकले. भारतीय संघ सुस्थितीत आहे. मात्र, असे असूनही ऑस्ट्रेलियाला कमी लेखता येणार नाही. सध्याच्या T20 आणि एकदिवसीय विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडे अ‍ॅलिसा हिली, बेथ मुनी, कर्णधार मेग लॅनिंग, ताहलिया मॅकगार, मेगन शुट यासारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्याचबरोबर भारताकडे कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्माही आहेत. जेमिमा रॉड्रिग्ज, राजेश्वरी गायकवाड अशी नावे आहेत. संघाला अष्टपैलू पूजा वस्त्राकरची उणीव भासणार आहे, जी कोरोना संसर्गामुळे अद्याप बर्मिंगहॅमला गेली नाही.

  • 29 Jul 2022 11:05 AM (IST)

    CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 : कोण तयार आहे?

    ऑस्ट्रेलियाने अलीकडच्या काळात फारसे क्रिकेट खेळलेले नाही. CWG च्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियानं आधीच इंग्लंडभोवती तळ ठोकला होता. ऑस्ट्रेलियानं आयर्लंडमध्ये तीन संघांच्या मालिकेत भाग घेतला. त्यात आयर्लंडविरुद्ध दोन विजय मिळवले. तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांवर पावसाचा परिणाम झाला. त्याआधी ऑस्ट्रेलियाने मार्च-एप्रिलमध्येच एकदिवसीय विश्वचषक खेळला होता. अशा स्थितीत संघ पूर्णपणे तयार होऊ शकत नाही.

  • 29 Jul 2022 10:54 AM (IST)

    Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुलमधील आजचे खेळ जाणून घ्या….

  • 29 Jul 2022 10:52 AM (IST)

    Ind Vs Aus 1st T20 : पारडं जड?

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2008 मध्ये पहिला T20 सामना खेळला गेला होता आणि ऑस्ट्रेलियाने फक्त 2 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांची विजयी घोडदौड अखंड सुरू राहिली आणि विजयाचे अंतरही वाढत गेले. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताच्या खात्यात फक्त 6 वेळाच यश आले आहे. ऑस्ट्रेलियाने 16 सामने जिंकले आहेत. तर एक अनिर्णित राहिला आहे. भारताला शेवटचा विजय सुमारे अडीच वर्षांपूर्वी 2020 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात मिळाला होता. जेव्हा पूनम यादवच्या फिरकीच्या जोरावर भारतानं 17 धावांनी विजय मिळवला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये दोन्ही संघांमधील शेवटचा सामना खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील 3 पैकी दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले, तर एक अनिर्णित राहिला.

  • 29 Jul 2022 10:46 AM (IST)

    Commonwealth Games 2022 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पहा

    1998 नंतर क्रिकेट पुन्हा एकदा या खेळांमध्ये परतले आहे.

    महिला क्रिकेटचा या खेळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

    हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असून आज त्यांचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

    हा सामना भारतीय वेळेनुसार 3.30 वाजता खेळवला जाईल. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published On - Jul 29,2022 10:42 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.