CWC 2022 : PV Sindhu एकटी लढली, पण सुवर्णपदकानं हुलकावणी दिली, रौप्यपदकावर समाधान
पहिल्याच सामन्यात भारताला कडवं आव्हान मिळालं होतं. टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मलेशियाच्या पुरुष दुहेरी जोडीनं भारताच्या रँकीरेड्डी आणि शेट्टी यांचा 21-18, 21-15 असा पराभव केला. सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा 2022 (CWC 2022) मध्ये सुवर्णपदकाची सर्वात मोठी आशा असलेल्या भारतीय बॅडमिंटन (CWG 2022 Badminton) संघाची निराशा झाली आहे. मिश्र सांघिक स्पर्धेतील गतविजेत्या CWG चॅम्पियनला अंतिम फेरीत मलेशियाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे टीम इंडियाच्या हातून सलग दुसरं सुवर्णपदक जिंकण्याची संधी निसटली. मात्र, भारतीय संघ रिकाम्या हातानं परतणार नाही, याची खबरदारी घेतली आणि त्यांनी जिद्दीसह त्यांच्या कामगिरीनं भारताच्या झोळीत रौप्य पदक टाकलं. भारताकडून स्टार शटलर पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) एकमेव सामना जिंकला. चार वर्षांपूर्वी 2018 च्या गोल्ड कोस्ट गेम्समध्ये, भारतानं प्रथमच या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर भारतानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव केला. पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आले, पण यावेळी भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मलेशियानं भारताचा पराभव करून सुवर्ण तर जिंकलेच, पण मागील पराभवाचा हिशेबही बरोबरीत सोडवला.
हा व्हिडीओ पाहा
This! Her dedication is out of this world
Below are the 7 consecutive points from Goh Jin Wei in the 1st set just now.
12-18 to 19-18
U gave everything you have, girl! Rest now ?
Gjw lost to Sindhu but she won in my eyes
20-22 17-21#Birmingham2022 #CommonwealthGames2022 pic.twitter.com/C04PBZC8wA
— Z ??? (@theone_xyz) August 2, 2022
सात्विक-चिरागचा पराभव, सिंधूचा पलटवार
पहिल्याच सामन्यात भारताला कडवं आव्हान मिळालं होतं. टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मलेशियाच्या पुरुष दुहेरी जोडीनं भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा 21-18, 21-15 असा पराभव करत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. अशा परिस्थितीत भारताला पुनरागमनाची गरज होती आणि ते सिंधूमुळे शक्य झाले. भारताची नंबर वन खेळाडू सिंधूने मोठ्या संघर्षानंतर दोन गेममध्ये पराभव केला. सिंधूने गोह जिन वेईचा 22-20 आणि 21-18 असा पराभव केला, ज्यामुळे भारताचे पुनरागमन झाले आणि स्कोअर 1-1 असा झाला.
किदांबीच्या पराभवाने सामना हिरावून घेतला
अंतिम फेरीतील तिसरा सामना सर्वात महत्त्वाचा पण भारतासाठी निराशाजनक ठरला, यानं भारताकडून सुवर्ण हिसकावले. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतसमोर जे योंगचे आव्हान होते आणि हा सामना या अंतिम फेरीतील सर्वात लांब सामना ठरला. श्रीकांतनं पहिला गेम 18-21 असा गमावला, पण दुसऱ्या गेममध्ये त्याने धमाकेदार पुनरागमन केलं. त्यांनी हा गेम 21-6 असा जिंकला. अशा स्थितीत निर्णायक गेममध्ये निर्णय घेण्यात आला आणि येथे मलेशियाच्या खेळाडूने 21-16 असा विजय मिळवत मलेशियाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
महिला दुहेरीत गायत्री गोपीनाथ आणि ट्रीज जॉली या युवा जोडीवर भारताच्या आशा वाचवण्याचे सर्व दडपण आले. ही 19 वर्षांची जोडी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या खेळात सहभागी होत होती, पण दोघांनीही सहजासहजी हार न मानता पूर्ण जोर लावला. मात्र, अननुभवीपणाचाही त्याच्यावर तोल गेला आणि शेवटपर्यंत टिकून राहूनही तो 18-21, 17-21 असा पराभूत झाला.