CWG 2022, Bindyarani Devi : बिंदियारानी देवीनं दाखवली तगडी ताकद, दुसऱ्या दिवशी भारताला किती पदके? जाणून घ्या…

CWG 2022 Weightlifting : पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेत असलेल्या बिंदियारानीने स्नॅचमध्ये चांगली सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात 81 किलो वजन उचललं. त्यानंतर पुढच्या दोन प्रयत्नांत तीनं 84 आणि 86 किलो वजन उचललं.

CWG 2022, Bindyarani Devi : बिंदियारानी देवीनं दाखवली तगडी ताकद, दुसऱ्या दिवशी भारताला किती पदके? जाणून घ्या...
बिंदियारानी देवीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 6:45 AM

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) मध्ये भारतासाठी दुसरा दिवस चांगला ठरला. भारतीय वेटलिफ्टर्सनी (Weightlifters)आपली ताकद दाखवत चारही स्पर्धांमध्ये पदके जिंकली. वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) दिवसाच्या शेवटच्या स्पर्धेत भारताच्या बिंदियारानी देवीनं (Bindyarani Devi) आपली तगडी ताकद दाखवली आणि भारतासाठी रौप्य पदक जिंकलं. बिंदियारानीनं क्लीन अँड जर्कमध्ये शेवटच्या प्रयत्नात 116 किलो वजन उचलून कांस्यपदकावरून थेट रौप्यपदकावर झेप घेतली आणि भारताचे चौथे पदक बॅगेत ठेवलं. भारताने शनिवारी 30 जुलैला पहिल्या पदकानं सुरुवात केली. वेटलिफ्टिंगमध्ये संकेत सरगरनं या खेळांमध्ये देशासाठी पहिलं पदक जिंकलं. त्याचवेळी दिवसाचा शेवट आणखी एका युवा वेटलिफ्टरच्या यशानं झाला. 23 वर्षीय बिंदियारानीनं महिलांच्या 55 किलो गटात एकूण 202 किलो वजनासह रौप्य पदक जिंकून देशाला चौथे यश मिळवून दिले.

पहिल्या फेरीत तिसरे स्थान

पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेत असलेल्या बिंदियारानीने स्नॅचमध्ये चांगली सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात 81 किलो वजन उचलले. त्यानंतर पुढच्या दोन प्रयत्नांत तीनं 84 आणि 86 किलो वजन उचललं. यामुळे ती या फेरीनंतर तिसऱ्या स्थानावर राहिली. पहिला नायजेरियाची लिफ्टर आणि दुसरी यजमान इंग्लंडची होती. यांनी अनुक्रमे 92 आणि 89 किलो वजन उचललं. या फेरीसह बिंदियाचं पदक दिसलं पण क्लीन अँड जर्क फेरी बाकी होती.

क्लीन अँड जर्कमध्ये बिंदियाची चमक

बिंदियानं या फेरीत खरं आश्चर्य दाखवलं. या फेरीत तिनं कोणत्याही वेटलिफ्टरपेक्षा जास्त वजन उचललं. बिंदियानं 110 किलो वजन उचलून यशस्वी सुरुवात केली परंतु दुसऱ्या प्रयत्नात 114 किलो वजन उचलण्यात ती अपयशी ठरली. मात्र, असं असूनही तिनं हार मानली नाही. यावेळी ती तिसऱ्या स्थानावर होती. पहिल्या स्थानावर येण्यासाठी त्याला 8 किलो वजन उचलावे लागलं. तर दुसऱ्या स्थानावर येण्यासाठी तिला 3 किलो वजन उचलावं लागलं.

हे सुद्धा वाचा

114 च्या अपयशानंतरही बिंदियानं 116 किलो वजन निश्चित केलं आणि कोणतीही अडचण न येता उचललं. इंग्लंडच्या लिफ्टरला मागे टाकून रौप्य पदक तिनं जिंकलं. नायजेरियाच्या अदिजात ओलारिनोयनं फक्त एक किलो अधिक म्हणजे 203 किलो वजनासह सुवर्णपदक जिंकलं, तर इंग्लंडच्या फ्रीर मोरोनं 198 किलो वजनासह तिसरं स्थान पटकावलं.

वेटलिफ्टिंगमध्ये यशस्वी दिवस

कालच्या दिवसातील इतर तीन वेटलिफ्टिंग स्पर्धेतही भारतानं पदके जिंकली. संकेतनं या खेळांमधील पहिलं पदक जिंकलं. 21 वर्षीय भारतीय वेटलिफ्टरने शेवटच्या लिफ्टपर्यंत संपूर्ण स्पर्धेत पहिलं स्थान राखलं होतं. परंतु मलेशियाच्या भारोत्तोलकानं अवघ्या एक किलो अधिक वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. संकेत दुखापतीमुळेही वजन वाढवू शकला नाही आणि 248 किलोसह रौप्यपदक जिंकलं. त्यानंतर पुढच्याच स्पर्धेत गुरुराजा पुजारीनं 269 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. मागील सामन्यांमध्ये त्यानं रौप्यपदक जिंकलं होतं. भारताची सर्वात मोठी आशा आणि टोकियो ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिनं अजिबात निराश केले नाही आणि 202 किलो वजनासह देशाचे पहिलं सुवर्ण जिंकलं.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.