CWG 2022, CWG 2022 Hockey : भारतीय महिला हॉकी संघानं 16 वर्षांनंतर पदक जिंकलं, न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदक

निर्धारित 60 मिनिटांत दोन्ही संघांनी 1-1 गोल केला होता. सलीमा टेटेने भारतासाठी पहिला गोल केला. त्याचवेळी न्यूझीलंडच्या ऑलिव्हिया मेरीने शेवटच्या क्षणी गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. सविस्तर वाचा...

CWG 2022, CWG 2022 Hockey : भारतीय महिला हॉकी संघानं 16 वर्षांनंतर पदक जिंकलं, न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदक
भारतीय महिला हॉकी संघानं 16 वर्षांनंतर पदक जिंकलंImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 4:28 PM

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) भारतीय महिला हॉकी संघाने (CWG 2022 Hockey) कांस्यपदकाच्या लढतीत न्यूझीलंडचा पराभव केला. संघानं पेनल्टी शूटआऊटमध्ये किवी संघाचा 2-1 असा पराभव केला. निर्धारित 60 मिनिटांत दोन्ही संघांनी 1-1 गोल केला होता. सलीमा टेटेने भारतासाठी पहिला गोल केला. त्याचवेळी न्यूझीलंडच्या ऑलिव्हिया मेरीने शेवटच्या क्षणी गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. तिथे भारतीय सविता पुनियाने शानदार गोलकीपिंग करताना न्यूझीलंडचे चार प्रयत्न हाणून पाडले. टीम इंडियाला (India Womens Hockey Team) तब्बल 16 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले आहे. भारतानं 2002 मध्ये सुवर्ण आणि 2006 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. उपांत्य फेरीत भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 3-0 असा पराभव झाला. निर्धारित 60 मिनिटांपर्यंत स्कोअर 1-1 असा होता. येथेही सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला, मात्र यावेळी महिला संघाने कोणतीही चूक केली नाही.

भारतीय संघाचा प्रवास:

  1. कांस्यपदकाच्या लढतीत त्यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केला.
  2. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा पराभव केला.
  3. भारताने गट सामन्यात कॅनडाचा 3-2 असा पराभव केला.
  4. ग्रुप मॅचमध्ये इंग्लंडने भारताचा 3-1 असा पराभव केला.
  5. भारताने गट सामन्यात वेल्सचा ३-१ असा पराभव केला.
  6. भारताने गट सामन्यात घानाचा 5-0 असा पराभव केला.

उपांत्य फेरीत भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 3-0 असा पराभव झाला. निर्धारित 60 मिनिटांपर्यंत स्कोअर 1-1 असा होता. येथेही सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला, मात्र यावेळी महिला संघाने कोणतीही चूक केली नाही.

हायलाईट्स

  1. संघानं पेनल्टी शूटआऊटमध्ये किवी संघाचा 2-1 असा पराभव केला
  2. निर्धारित 60 मिनिटांत दोन्ही संघांनी 1-1 गोल केला होता
  3. सलीमा टेटेने भारतासाठी पहिला गोल केला
  4. न्यूझीलंडच्या ऑलिव्हिया मेरीने शेवटच्या क्षणी गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला
  5. तिथे भारतीय सविता पुनियाने शानदार गोलकीपिंग करताना न्यूझीलंडचे चार प्रयत्न हाणून पाडले
  6. टीम इंडियाला तब्बल 16 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले आहे.

न्यूझीलंड संघाने शेवटच्या क्वार्टरची सुरुवात आक्रमक पद्धतीनं केली. त्याने सलग दोन हल्ले केले. पण भारतीय संघाने त्याला परतवून लावले. भारताला 52 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर संघाला गोल करता आला नाही. दोन मिनिटांनंतर भारतालाही सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि दोन्ही वेळा टीम इंडिया गोल करण्यात अपयशी ठरली. शेवटच्या क्षणी भारतीय खेळाडूच्या चुकीमुळे न्यूझीलंडला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि ऑलिव्हिया मेरीने गोल नोंदवून बरोबरी साधली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.