कॉमनवेल्थ गेम्स (CWG) लेटेस्ट न्यूज: भारतीय खेळाडूंनी बर्मिंघम मध्ये पदक विजेती कामगिरी सुरु केली आहे. भारताने आतापर्यंत सहा पदक मिळवली आहेत. ही सर्व मेडल्स वेटलिफ्टिंगच्या क्रीडा प्रकारात मिळाली आहेत. आज पुन्हा एकदा वेटलिफ्टर्सवर नजर असेल. आज 81 किलो वजनी गटात अजय सिंह उतरणार आहे. महिलांच्या 71 किलो वजनी गटात भारताला हरजिंदर कौरकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. बॅडमिंटनच्या मिक्स्ड इवेंट मध्ये भारतीय टीमवर नजर असेल. ते आपलं मेडल निश्चित करु शकतात. भारतीय पुरुष हॉकी संघ सुद्धा इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरेल.
भारताच्या सुशीलाने ज्युडोच्या 48 किलो गटात देशासाठी रौप्य पदक जिंकले. तिला दक्षिणेच्या मिकाएला वैतोईविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने रौप्यपदक जिंकले होते.
भारतीय हॉकी संघाचा इंग्लंडविरुद्धचा सामना 4-4 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात भारताने मोठी आघाडी घेतली होती पण शेवटच्या क्वार्टरमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि केवळ बरोबरीत समाधान मानावे लागले.
ज्युडो मध्ये पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात विजय सिंह, महिलांमध्ये सुचिका तरियाल (57 किलो), जसलीन सैनी (66 किलो) रॅप चेंज मध्ये ब्राँझ मेडलसाठी खेळणार आहेत.
स्क्वॉश मध्ये महिला एकेरी गटात सुनयना साराने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. तिने श्रीलंकेच्या चनमिथा सिनलीवर 3-0 (11-3, 11-2,11-2) असा विजय मिळवला.
भारताला ज्युडो मध्ये पहिलं मेडल निश्चित झालं आहे. सुशीला देवीने 48 किलो वजनी गटात सेमीफायनल मॅच मध्ये टॉप सीडेड मॉरिशेसच्या प्रिससिला मोरांडला हरवलं. म्हणजे रौप्यपदक निश्चित झालं आहे.
जुडो मध्ये भारतासाठी निराशाजनक बातमी आहे. 66 किलो वजनी गटात भारताच्या जसलीन सैनीला पराभवाचा सामना करावा लागलाय. स्कॉटलंडच्या फिनले एलनने पराभव केला.
अमित पंघालने राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात 5-0 ने विजय मिळवला. त्याने वानातोचा बॉक्सरला हरवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
स्वीमिंग मध्ये पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय मध्ये साजन प्रकाश आपल्या हीट मध्ये सातव्या स्थानावर राहिला. 54.36 सेकंदाच्या वेळेसह तो ओव्हरऑल 19 व्या स्थानावर आहे, टॉप 16 खेळाडू पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय करतील.
भारताच्या सुशीला देवीने मालावीच्या हॅरियत बोनफेस हरवून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे.
अजय सिंह तिसऱ्या प्रयत्नात फेल ठरला. त्याने 180 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. क्लीन अँड जर्कच्या शेवटच्या प्रयत्नात त्याने 180 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. या सेक्शन मध्ये त्याने सर्वात जास्त 176 किलो वजन उचललं.
अजय सिंहने क्लीन अँड जर्क मध्ये शानदार सुरुवात केली आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात 172 किलो वजन उचललं.
भारतीय महिला टीमने लॉन बॉल मध्ये पदक निश्चित केलं आहे. भारतीय महिला संघाने न्यूझीलंडला 16-13 असं पराभूत केलं. भारताने न्यूझीलंडला सेमीफायनल मध्ये हरवून फायनल मध्ये जागा मिळवलीच. पण पदकही निश्चित केलं आहे. आधी भारतीय संघ 6-1 असा पिछाडीवर पडला होता. पण त्यांनी दमदार पुनरागमन केलं.
GEARING UP ??
Indian Judokas ? warming up ahead of their matches at @birminghamcg22
The action is about to begin, stay tuned!! #Cheer4India #IndiaTaiyaarHai#India4CWG2022 pic.twitter.com/eJoeSPRwVj
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2022
लॉन बॉल मध्ये भारतीय महिला संघ न्यूझीलंड विरुद्ध पिछाडीवर पडला होता. पण त्यांनी दमदार पुनरागमन केलय. सध्या ते 10-7 ने आघाडीवर आहेत.
अजय सिंहने स्नॅच मध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. तिन्ही प्रयत्नात तो यशस्वी ठरला. पहिल्या प्रयत्ना 136 किलो, दुसऱ्या प्रयत्नात 140 किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात 143 किलो वजन उचललं. पाकिस्तानी वेटलिफ्टर हैदर अली स्नॅच मध्ये अजय सिंह समोर टिकूच शकला नाही.
A special message from our Heroes at the Borders ?
Best wishes to ??weightlifter Ajay Singh for his event today ?️♂️ at the #CommonwealthGames2022 ?
Listen In?
Let’s #Cheer4India ??#IndiaTaiyaarHai?#India4CWG2022@PMOIndia @ianuragthakur @NisithPramanik @adgpi pic.twitter.com/RlWyg0qAic
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2022
अजय सिंहने स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात 137 किलो वजन उचललं. सुरुवातीला तो थोडा गडबडला. पण वजन उचलण्यात तो यशस्वी ठरला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 140 किलो वजन उचललं.
वेटलिफ्टिंग मध्ये आणखी एका पदकांची अपेक्षा आहे. अजय सिंहवर सगळ्यांच्या नजरा आहेत. भारताने आतापर्यंत सहा मेडल्स जिंकली आहेत. ही सर्व मेडल्स वेटलिफ्टर्सनी मिळवून दिली आहेत.
बऱ्याच जणांना नोटीस आली, काही लोकांनी उत्तर दिलं… काहींनी नाही दिलं
राज्य आणि देशातील यंत्रणांनी सूड बुद्धीने किंवा सूड भावनेने कोणतीही कारवाई करता कामा नये
4 दिवसांचा दौरा करून आल्यानंतर उद्या मी मुख्यमंत्री यांना भेटून पत्र देणार आणि पत्रकार परिषद घेणार
केंद्रात सरकार असल्यावर राष्ट्रीय पातळीवर पक्ष टिकाव म्हणून अशी विधान करावी लागतात
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भिंत कोसळली
घरातील अंतर्गत भिंत कोसळून विनिता पुणेकर नामक महिला ठार
घरात टीव्ही बघत असलेल्या कुटुंबावर अचानक कोसळली भिंत
पती व मुलगी अपघातात गंभीर जखमी,
चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कमकुवत झाली होती भिंत
भारतीय महिला संघ लॉन बॉल मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल खेळत आहे. न्यूझीलंडचा संघ 6-1 ने आघाडीवर आहे. भारतीय संघात लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सायकिया आणि रुपा रानी टिर्कीचा समावेश आहे.
आपल्याला संपवायचा डाव आहे
सर्व खोटं कैलेलं आहे
संजय राऊत यानी कोर्ट परिसरात अनौपचारिक बोलले
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हिंगोली शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन
नांदेड नाका/गांधी चौकातून मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन
शहरातील महावीर भवनात शिवसैनिकांची मोठी गर्दी
थोड्याच वेळात सह संपर्क प्रमुख बबनराव थोरात व काँग्रेसमधून आलेले माजी खासदार सुभाष वानखेडे साधणार ठाकरेच्या शिवसैनिकांशी सवांद
संजय राऊत पूर्णपणे दोषी आहेत.
हा तपास प्रदीर्घ काळापासून सुरू असून अनेक कारवाई आणि चौकशीही झाल्या आहेत.
जेव्हा जेव्हा तपास यंत्रणा एखाद्याला ताब्यात घेते तेव्हा काहीतरी घडते
संजय राऊत यांच्या अटकेवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू एम्मा मॅककॉनने महिलांच्या 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक मिळवलं. राष्ट्रकुल मधली ती सर्वात यशस्वी खेळाडू बनली आहे. मॅककॉनने राष्ट्रकुल मध्ये 11 सुवर्णपदक जिंकलं आहे. हा एक रेकॉर्ड आहे. या 28 वर्षीय खेळाडूचं बर्मिंघम मध्ये तिसरं सुवर्णपदक आहे.
बॅडमिंटन मध्ये आजचा दिवस भारतासाठी खास आहे. मिक्स्ड टीम इवेंट मध्ये भारताचा सामना सिंगापूर विरुद्ध होईल. फायनल मध्ये स्थान मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
Day 4️⃣ at CWG @birminghamcg22
Take a ? at #B2022 events scheduled for 1st August
Catch #TeamIndia?? in action on @ddsportschannel & @SonyLIV and don’t forget to send in your #Cheer4India messages below#IndiaTaiyaarHai #India4CWG2022 pic.twitter.com/UDwvKOXJI9
— SAI Media (@Media_SAI) August 1, 2022
भारताने आतापर्यंत 6 पदकं मिळवली आहेत.यात वेटलिफ्टिंग मध्ये 3 गोल्ड मेडल आहेत. वेटलिफ्टिंग मध्ये आणखी पदकं मिळू शकतात. 81 किलो वजनी गटात अजय सिंह दुपारी 2 वाजता, महिला 71 किलो वजनी गटात हरजिन्दर कौरचा रात्री 11 वाजता सामना आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ संध्याकाळी 6.30 वाजता इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरेल.