CWG 2022, Naveen Kumar : रवी दहिया, विनेश फोगटनंतर नवीननेही सुवर्णपदक जिंकले, भारताचे 34वे पदक
नवीन कुमारने भारताला कुस्तीत सहावे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने 74 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे 34 वे पदक आहे.
नवी दिल्ली : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) आज नवव्या दिवसाचे सामने सुरू आहेत. नवीन कुमारने (Naveen Kumar) भारताला (India) कुस्तीत सहावे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने 74 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे 34 वे पदक आहे. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे . भारतीय कुस्तीपटू नवीन कुमारने फ्रीस्टाइल 74 किलो गटात पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. कुस्तीतील भारताचे हे सहावे सुवर्ण आहे. नवीन कुमारने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला 12 वे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याचबरोबर कुस्तीतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. याआधी आज रवी दहिया आणि विनेश फोगट यांनी वेगवेगळ्या वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
नवीननेही सुवर्णपदक जिंकले
#WrestleBirmingham FS 74kg medal match results:
? Naveen NAVEEN ?? df. Muhammad TAHIR ??, 9-0 ?Jasmit PHULKA ?? df. Cole HAWKINS ??, 10-0 ? Ogbonna JOHN ?? df. Charlie BOWLING ???????, 10-0
— United World Wrestling (@wrestling) August 6, 2022
विनेश फोगटने सुवर्णपदक जिंकले
भारताची ज्येष्ठ कुस्तीपटू विनेश फोगटने तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले . तिने 53 किलो फ्रीस्टाइलमध्ये श्रीलंकेच्या चामोदय केशानीचा पराभव केला. विनेशने हा सामना 4-0 ने जिंकला. तिने 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये 48 किलो गटात आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकले.
रवी दहियानेही सुवर्णपदक जिंकले
भारताचा स्टार कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले आहे. त्याचे पहिले पदक सुवर्ण आहे. रवीने फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नायजेरियाच्या अबिकवेनिमो विल्सनचा 10-0 असा पराभव केला. कुस्तीतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे.
प्रथमच…
रवी हा चमत्कार करणारा पहिला पैलवान आहे. तो पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळला आणि अपेक्षेपलीकडे जाऊन देशाला रौप्यपदक मिळवून दिले. टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये रवी पदक जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते पण तो अंतिम फेरीत पोहोचला आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी झाला. त्याचप्रमाणे तो प्रथमच राष्ट्रकुल खेळ खेळत होता आणि त्याच्या पहिल्याच खेळात तो सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. इथे मात्र त्याच्याकडून सुवर्णपदकाचीच आशा होती, जी त्याने पूर्ण केली. याशिवाय आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्याचे कांस्यपदक आहे. जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला.