CWG 2022, Nikhat Zareen : निकहत जरीनचा गोल्ड पंच, ‘सुवर्ण’ कामगिरीनं भारताच्या पदकसंख्येत भर
निखत जरीनचं हे पहिलेच पदक आहे. नुकतेच तिनं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं होतं. निखतनं प्रतिस्पर्ध्यापासून अंतर राखलं आणि संधी मिळताच तिनं डावा जबर मारला जो चेहऱ्यावर लागला.
नवी दिल्ली : बॉक्सिंगमध्ये (CWG 2022 Boxing) भारताला आणखी एक यश मिळाले आहे. देशाची महिला बॉक्सर आणि जगज्जेती निकहत जरीनने (Nikhat Zareen) रविवारी राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) सुवर्णपदक जिंकले. निखतने 51 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कॅरी मॅकनॉलचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या खेळांमधील निखतचे हे पहिलेच पदक आहे. नुकतेच तिनं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. सुरुवातीला निखतनं प्रतिस्पर्ध्यापासून अंतर राखलं आणि संधी मिळताच तिनं डावा जबर मारला जो तिच्या चेहऱ्यावर लागला. मॅकनॉलची उंची निखतपेक्षा कमी आहे. त्यामुळे ती जास्त पुढे जात नव्हती. दरम्यान, तिने निखतला चांगलीच धक्काबुक्की केली. निखतनं मात्र संयम बाळगला आणि पहिल्या फेरीच्या मध्यभागी निखतनं दोन्ही बाजूंनी हल्ला केला आणि हुक केले आणि चांगले पंच केले. मात्र, दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. पण पाचही पंचांनी निखतला पुढे कले.
निकहत जरीनचा गोल्ड पंच
?????? ????? ?
Reigning world champion @nikhat_zareen continues her golden run as she seals the 50kg Final bout in an unanimous decision and make her statement in style. ??
Kudos girl! ?@AjaySingh_SG | @debojo_m #CommonwealthGames2022 #PunchMeinHainDum 2.0 pic.twitter.com/LSsku6gLhN
— Boxing Federation (@BFI_official) August 7, 2022
दुसऱ्या फेरीत अर्धा सामना जिंकला
निखतने दुसऱ्या फेरीत सावध सुरुवात केली. तर मॅकनॉलने आक्रमणाची रणनीती अवलंबली. निखत मात्र थोडी बचावात्मक दिसली ज्यामुळे ती मॅक्नॉलच्या प्रयत्नांना हाणून पाडू शकली. मॅकनॉल अधिक आक्रमक होती ज्यामुळे ती थकल्यासारखी दिसत होती. दुसऱ्या फेरीतही पाच पंचांनी निखतच्या बाजूने निकाल दिला. येथून निखतच्या वाट्याला सोने येणार हे जवळपास निश्चित झाले होते.
ही तिसरी फेरी
निखतने तिसऱ्या फेरीतही आपले वर्चस्व दाखवले. मॅकनॉलच्या अतिआक्रमकतेचा ती फायदा घेत होती. पण निखतने अत्यंत सावधगिरीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत बचावात्मक कौशल्य दाखवले. निखतने चतुराईने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आणि त्यांना जवळ बोलावून हल्ला करण्याची रणनीती अवलंबली.
दिवसाचे तिसरे सुवर्णपदक
निखतने रविवारी बॉक्सिंगमध्ये भारताला तीन सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. त्याच्या आधी भारताचा दिग्गज बॉक्सर अमित पंघल याने 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. तिच्याआधी, नीतू गंघासने महिलांच्या किमान वजन (45-48 किलो) गटाच्या अंतिम फेरीत जागतिक चॅम्पियनशिप 2019 कांस्यपदक विजेत्या रेझॅटन डेमी जेडचा 5-0 असा एकमताने पराभव केला. भारताने तिन्ही पदके 5-0 च्या फरकाने जिंकली आहेत.