CWG 2022, Ravi Dahiya : रवी दहिया चमकला, भारतासाठी 10 वे सुवर्णपदक
रवीनं शनिवारी अंतिम फेरीत पदक जिंकलं. दहियानं हा सामना 10-0 ने जिंकला. रवीनं न्यूझीलंडच्या सूरज सिंगला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. रवीनं फायनल जिंकण्यासाठी 2 मिनिटे 16 सेकंद घेतले
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवी दहिया (Ravi Dahiya) याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 (CWG 2022) मध्ये पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले आहे. रवीनं शनिवारी अंतिम फेरीत तांत्रिक कार्यक्षमतेच्या आधारे पदक जिंकलं. रवी दहियानं हा सामना 10-0 ने जिंकला. रवीनं न्यूझीलंडच्या सूरज सिंगला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. रवी दहियानं फायनल जिंकण्यासाठी 2 मिनिटे 16 सेकंद घेतले. रवी दहियाला माहित होते की आपले विरोधक पायात कमकुवत आहेत त्यामुळे त्याला पाय पकडायचे होते. यादरम्यान नायजेरियन खेळाडूने आक्रमण केले मात्र रवीने दमदार खेळ दाखवत त्याला पायचीत केले. दरम्यान, रवीला रेफ्रींनी निष्क्रियतेचा इशारा दिला होता. येथून रवीने आपली ताकद दाखवत दोन गुणांची बाजी मारली आणि नंतर प्रतिस्पर्ध्याचे पाय पकडून त्यांना गुंडाळत स्कोअर 8-0 असा केला.
रवी दहिया चमकला
RAVI WINS G?LD ?
3 time Asian Champion & #Tokyo2020 Olympics ? medalist ?♂️ @ravidahiya60 (M-57kg) has now conquered the #CommonwealthGames, winning GOLD ?on his debut ?
Brilliant Gutwrench & winning by technical superiority, that’s stoic & determined RAVI for you ? 1/1 pic.twitter.com/UhLFq7c8od
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2022
दहियानं हा सामना 10-0 ने जिंकला
- दहियानं हा सामना 10-0 ने जिंकला
- रवीनं न्यूझीलंडच्या सूरज सिंगला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती
- रवी दहियानं फायनल जिंकण्यासाठी 2 मिनिटे 16 सेकंद घेतले
- रवी दहियाला माहित होते की आपले विरोधक पायात कमकुवत आहेत
- त्यामुळे त्याला पाय पकडायचे होते. यादरम्यान नायजेरियन खेळाडूने आक्रमण केले मात्र रवीने दमदार खेळ दाखवत त्याला पायचीत केले.
प्रथमच…
रवी हा चमत्कार करणारा पहिला पैलवान आहे. तो पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळला आणि अपेक्षेपलीकडे जाऊन देशाला रौप्यपदक मिळवून दिले. टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये रवी पदक जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते पण तो अंतिम फेरीत पोहोचला आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी झाला. त्याचप्रमाणे तो प्रथमच राष्ट्रकुल खेळ खेळत होता आणि त्याच्या पहिल्याच खेळात तो सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. इथे मात्र त्याच्याकडून सुवर्णपदकाचीच आशा होती, जी त्याने पूर्ण केली. याशिवाय आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्याचे कांस्यपदक आहे. जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला.