IND vs ENG, CWG 2022 : महिला क्रिकेट टीमची कमाल, उपांत्य फेरीत इंग्लंडचा 4 धावांनी पराभव, भारत अंतिम फेरीत दाखल
टीम इंडियाने (IND vs ENG) उपांत्य फेरीत इंग्लंडचा 4 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 6 विकेट्सवर केवळ 160 धावा करू शकला.
नवी दिल्ली : भारताने राष्ट्रकुल 2022 च्या (CWG 2022) महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने (IND vs ENG) उपांत्य फेरीत यजमान इंग्लंडचा 4 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघ 6 विकेट्सवर केवळ 160 धावा करू शकला. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटच्या अंतिम फेरीतील खेळाडूंचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून इतिहास रचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय (India) संघाने पहिल्या उपांत्य फेरीत यजमान इंग्लंडचा 4 धावांच्या फरकाने पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटमधील पहिले पदक निश्चित केले. स्मृती मानधनाच्या धडाकेबाज अर्धशतकानंतर स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांच्या तगड्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला.
आयसीसीचं ट्विट
India seal a nervy four-run win over England! #ENGvIND | #B2022 | ? https://t.co/hKqgbrJSoN pic.twitter.com/qnx7oPPSYu
— ICC (@ICC) August 6, 2022
फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणाशी होणार?
या विजयासह भारताने इंग्लंडच्या जुन्या खात्यातही बरोबरी साधली आहे. 2017 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारताला शेवटच्या षटकात लक्ष्य गाठण्यापासून रोखले आणि सामना फक्त 9 धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. तो पराभव भारतीय संघाच्या आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात पाच वर्षांपासून होता, जो आता बऱ्याच अंशी पूर्ण झाला आहे. फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणाशी होणार, याचा निर्णय शनिवारी रात्री ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलच्या निकालावरून स्पष्ट होईल.
बीसीसीआयचं ट्विट
FINALS, here we come ???#TeamIndia #GoForGlory pic.twitter.com/wSYHmlv3rb
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
सामन्यात काय झालं?
प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या. भारताकडून स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने उत्कृष्ट खेळी करत 62 धावा केल्या. स्मृतीशिवाय टीम इंडियाकडून जेमिमा रॉड्रिग्जने शेवटच्या षटकात जोरदार फलंदाजी करत संघाला या धावसंख्येपर्यंत नेले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला मोठे योगदान देता आले नाही.
इंग्लंडची वेगवान सुरुवात
प्रत्युत्तरात इंग्लंडने वेगवान सुरुवात केली. सोफिया डंकले आणि डॅनी व्याट या सलामीच्या जोडीने 3 षटकात 28 धावा केल्या होत्या, पण इथे दीप्ती शर्माने भारताला पहिली मोठी यश मिळवून दिली आणि आक्रमक फलंदाजी करणाऱ्या डंकलेला एलबीडब्ल्यू केले. यानंतरही अॅलिस कॅप्सी आणि डॅनी व्याट यांच्यातील भागीदारी वाढत गेली, परंतु या संपूर्ण सामन्यात भारताने क्षेत्ररक्षणातही इंग्लंडपेक्षा सरस कामगिरी केली आणि येथूनच त्याची सुरुवात झाली. तानिया भाटियाच्या वेगवान थ्रोवर कॅप्सी धावबाद झाली आणि भारताने सुटकेचा नि:श्वास सोडला.