ओरेगॉन : भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्रा (Neeraj Chopra) जागतिक चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championship) इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. शुक्रवारी भालाफेकच्या (Javelin Throw) अंतिम स्पर्धेत त्याने प्रवेश केला. नीरजला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत. पहिल्या थ्रोसह तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. या जागतिक स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदकाची सर्वात मोठी आशा नीरजकडे आहे. कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजला आता रविवारी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची 19 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची संधी आहे. नीरज चोप्राच्या गटात असलेल्या टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जाकुब वडलाकेनेही स्वत:च्या फेकने अंतिम फेरी गाठली. त्याने 85.23 मीटर अंतर फेकले. त्याचवेळी लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन केशोर्न वॉलकॉट संघर्ष करताना दिसला. त्याचा सर्वोत्तम थ्रो 76.63 होता आणि तो आपल्या गटात सातव्या स्थानावर राहिला.
अंतिम फेरीत जाण्यासाठी पात्रता गुण 83.50 मीटर ठेवण्यात आला होता. नीरज गटाचा भाग होता आणि तो फेकण्यात प्रथम आला. पहिल्याच प्रयत्नात त्याने 88.39 मीटरचे अंतर कापले आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. हा त्याचा वर्षातील तिसरा सर्वोत्तम थ्रो आहे. चोप्रा, 24, 30 जून रोजी स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये हंगामातील 89.94m चा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न केल्यानंतर जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदकांच्या दावेदारांपैकी एक आहे. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज 2003 मध्ये पॅरिस येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली.
नीरजनं चोप्राच्या गटात असलेल्या टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जाकुब वडलाकेनेही स्वत:च्या फेकने अंतिम फेरी गाठली. त्याने 85.23 मीटर अंतर फेकले. त्याचवेळी लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन केशोर्न वॉलकॉ त्याचा सर्वोत्तम थ्रो 76.63 होता. संघर्ष करताना दिसला.णि तो आपल्या गटात सातव्या स्थानावर राहिला.
नीरज चोप्राच्या गटात असलेल्या टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जाकुब वडलाकेनेही स्वत:च्या फेकने अंतिम फेरी गाठली. त्याने 85.23 मीटर अंतर फेकले. त्याचवेळी लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन केशोर्न वॉलकॉट संघर्ष करताना दिसला. त्याचा सर्वोत्तम थ्रो 76.63 होता आणि तो आपल्या गटात सातव्या स्थानावर राहिला. नीरज चोप्राने या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकल्यास, 2008-09 मधील नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्किलडसननंतर जागतिक विजेतेपदासह ऑलिम्पिक यशानंतर तो पहिला भालाफेकपटू होईल. वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर नीरजला कॉमनवेल्थ गेम्समध्येही सहभागी व्हायचं आहे.