नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण किती महत्त्वाचं आहे, हे पटवून दिलंय भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन (R Ashwin) याने… आपल्या कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ओढावलेली परिस्थिती सांगताना अश्विन भावूक झाला होता. त्याचवेळी कोरोना लसीने आपल्या वडिलांचा जीव वाचवला, असं अश्विनने आवर्जून सांगितलं. तसंच देशातल्या तमाम पात्र लोकांनी कोरोनावरची लस घ्यावी, असं आवाहनही त्याने केलं आहे. (corona vaccine saved my father life Said Indian Player R Ashwin)
माझ्या सगळ्या कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली होती. माझ्या वडिलांची तब्येत पहिल्यांदा ठीक होती पण नंतर त्यांच्या ऑक्सिजनची लेव्हल 85 वर आली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. डिस्जार्च मिळूनही त्यांच्या ऑक्सिजनच्या लेव्हलमध्ये फरतक जाणवत नव्हता. माझ्या वडिलांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. खरं तर मी असं म्हणेन की माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीनेच वाचवला, असं अश्विनने सांगितलं.
आर अश्विनने आयपीएल 2021 ची स्पर्धा अर्ध्यावर सोडली. आपल्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याने आयपीएल अर्ध्यावर सोडत असल्याची घोषणा केली. कुटुंबावरती कठीण समय आल्याने माझी त्यांना आता सर्वांत जास्त गरज आहे, असं म्हणत अश्विनने स्पर्धा अर्ध्यावर सोडली होती.
आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय जाहीर करताना अश्विनने ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “आयपीएलच्या 14 व्या पर्वात मी ब्रेक घेतोय. माझे कुटुंबीय कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. या कठीण काळात मी माझ्या कुटुंबासमवेत असावं असं मला वाटतं. जर पुढील गोष्टी योग्य दिशेने घडत गेल्या तर मी पुन्हा दिल्लीसाठी खेळायला येईन..”
“मी जेव्हा आयपीएल खेळत होतो, त्यावेळी माझ्या घरातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. मी आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने माझ्या पत्नीने याची माहिती मला दिली नव्हती. मात्र नंतर मला अवस्था कळाली. माझ्या मुलांना 3 ते 4 दिवस सलग ताप आला. औषधोपचार घेऊनही त्यांना बरं वाटतं नव्हतं. अखेर मी आयपीएलमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आता घरातील सदस्य ठीक आहेत”, असं अश्विनने सांगितलं.
(corona vaccine saved my father life Said Indian Player R Ashwin)
हे ही वाचा :
न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूची फॅन्सला हात जोडून विनंती, म्हणाला, ‘2019 च्या फायनलची…..’
PHOTO | अक्षर पटेल आणि हसन अली आमनेसामने, 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक वेळा 5 विकेट्स कोणाच्या नावावर?