IPL 2021 : आयपीएल स्थगित, खेळाडू मालदीवमध्ये क्वारंटाईन!

ऑस्ट्रेलियन खेळाडू, कोच, कॉमेंटेटर सुखरुपपणे भारतातून मालदीवला पोहोचले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने संयुक्तपणे यासंबंधीचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. (Cricket Australia confirms Australian players have been safely transported from India to Maldives)

IPL 2021 : आयपीएल स्थगित, खेळाडू मालदीवमध्ये क्वारंटाईन!
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 2:55 PM

मुंबई : कोरोना व्हायरसने थेट क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केल्याने बीसीसीआयने महत्तपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला. आयपीएलचं 14 वं पर्व तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. आयपीएल (IPL2021) स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी कसे परतणार, यासंबंधी बरीच चर्चा सुरु होती. अखेर चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू, कोच, कॉमेंटेटर सुखरुपपणे भारतातून मालदीवला पोहोचले आहेत. तिथे पुढचे काही दिवस ते क्वारंन्टाईन असणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने संयुक्तपणे यासंबंधीचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. (Cricket Australia confirms Australian players have been safely transported from India to Maldives)

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचं संयुक्त निवेदन

सध्या ऑस्ट्रेलियन खेळाडू काही दिवस मालदीवमध्ये थांबतील. ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी विमानसेवा सुरु झाल्यानंतर ते मालदीववरुन मायदेशी रवाना होतील. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने ऑस्ट्रेलिया सरकारकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांमधून कोणतीही सूट मागितलेली नाहीय, असं क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनातून सांगितलं आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बीसीसीआयचे आभार

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदीवला पोहोचवण्यात बीसीसीआयचा महत्त्वाचा वाटा राहिला. याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीयचे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने अभिनंदन केले आहे तसंच आभार मानले आहेत.

कोरोनाबाधित माईक हसी भारतातच

जरी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवला पोहोचले असले तरी चेन्नईच्या ताफ्यातील माईक हसी सध्या भारतातच आहे. माईक हसीला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे. माईक हसीला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. चेन्नई सुपर किंग्ज त्याची चांगली काळजी घेत आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन बीसीसीआय सोबत बोलून योग्य वेळी माईकला ऑस्ट्रेलियात पोहचवण्याचा निर्णय घेतील.

(Cricket Australia confirms Australian players have been safely transported from India to Maldives)

हे ही वाचा :

सायली संजीवच्या फोटोवर ऋतुराज गायकवाड फिदा, सायलीनेही लाजत ‘दिल’ दिया

आयपीएल स्थगितीच्या घोषणेनंतर शोएब म्हणतो, ‘मी पहिल्यांदाच BCCI ला सांगितलं होतं…’

आयपीएल स्थगित होताच रियान परागचं ट्विट, नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार, पण ट्विटमध्ये नेमकं काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.