Kagiso Rabada : गर्लफ्रेन्डच्या पप्पासमोर शायनिंग मारायला गेला क्रिकेटर कॅगिसो रबाज, हिंदी अशी बोलला की तुमची हसून हसून वाट लागेल…
दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज असलेला कागिसो रबाडा भारतीय रेडिओ जॉकी करिश्मासोबत हिंदीत बोलताना दिसला आहे.
नवी दिल्लीः दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा घातक बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. तो आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला होता. परदेशी खेळाडू जेव्हा आयपीएलमधून खेळत असतात तेव्हा ते भारतीय खेळाडूंबरोबर हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. पण आता दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज रबाडा हिंदी बोलत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज असलेला कागिसो रबाडा भारतीय रेडिओ जॉकी करिश्मासोबत हिंदीत बोलताना दिसला आहे. यादरम्यान ती रबाडाला भारतीय पालकांना कसे प्रभावित करायचे असते ते सांगते.
View this post on Instagram
यामध्ये त्याने काही शब्द चुकीचेही म्हटले आहेत. एकदा तो ‘धन्य हो गया’ला ‘धनिया’ म्हणतो, त्याचवेळी तो नमस्ते सासरे चुकीचेही म्हणताना दिसून येत आहे मात्र हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
कागिसो रबाडा हा त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी अनेक सामने त्याच्या गोलंदाजीच्या बळावर जिंकून दिले आहेत.
जेव्हा तो आपल्याच तालात असतो तेव्हा मात्र तो भल्या भल्यांना गारद करतो. सामन्याच्या सुरुवातीलाच जर तो आला तर मात्र त्याच्या आक्रमक खेळीमुळे तो आपलं अस्तित्व सिद्ध करत असतो.
कागिसो रबाडाने दक्षिण आफ्रिकेकडून 55 कसोटी सामन्यात 257 विकेट्स, 87 एकदिवसीय सामन्यात 135 बळी आणि 49 टी-20 सामन्यात 55 बळी घेतले आहेत.