IND vs NED : भारत विरुद्ध नेदरलँड सामना, हे 11 खेळाडू भरतील तुमची झोळी!
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटचा म्हणजेच 45 वा सामना भारत आणि नेदरलँड यांच्यात होत आहे. भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे हा एक औपचारिक सामना असणार आहे. उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे.
मुंबई : भारत आणि नेदरलँड यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. भारताचं या सामन्यात पारडं जड आहे. तसेच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकण्याचा मान मिळणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील निवडक 11 खेळाडूंवर नजर असणार आहे. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी मैदानात हा सामना असणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत सर्व संघांना पराभूत करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. तर नेदरलँड या स्पर्धेत आणखी एक विजय मिळवून शेवट गोड करण्याच्या तयारीत आहे. कारण गुणतालिकेत 8 वं स्थान गाठलं तर चॅम्पियन ट्रॉफी 2025 चं तिकीट मिळणार आहे. भारत आणि नेदरलँड यांच्या आतापर्यंत दोन वनडे सामने झाले आहेत. दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यातही भारताचं पारडं जड आहे. पण नेदरलँडला कमी लेखून चालणार नाही. दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारली आहे.
पिच रिपोर्ट
बंगळुरुचं एम चिन्नास्वामी स्टेडियम फलंदाजीसाठी जबरदस्त आहे. शॉर्ट बॉन्ड्री लाइनमुळे फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता येणार आहे. या खेळपट्टीवर चेंडू एक विशिष्ट मर्यादेपर्यंत उसळी घेतो. त्यामुळे फलंदाजांना चेंडू योग्य टप्प्यात घेऊन सीमरेषेबाहेर मारता येईल. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटूंना या खेळपट्टीवर मदत मिळेल. आतापर्यंत 30 सामने या मैदानावर खेळले गेले आहेत. यापैकी पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकला तर प्रथम गोलंदाजी स्वीकारली जाण्याची शक्यता आहे. या सामन्यात रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहलीच्या खेळीकडे लक्ष असेल. भारताची पहिली फलंदाजी आली तर मग पॉइंट्सच्या गणितासाठी या तिघांचा विचार करता येईल.
ड्रीम इलेव्हन 1
- विकेटकीपर: केएल राहुल, स्कॉट एडवर्ड्स
- फलंदाज: रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), वेस्ली बॅरेसी, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार)
- अष्टपैलू: रवींद्र जडेजा, बास डी लीडे
- गोलंदाज: जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आर्यन दत्त
ड्रीम इलेव्हन 2
- विकेटकीपर: केएल राहुल, स्कॉट एडवर्ड्स
- फलंदाज: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, मॅक्स ओ’डौड
- अष्टपैलू: रवींद्र जडेजा, लोगन व्हॅन बीक
- गोलंदाज: जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी (उपकर्णधार), रोलोफ व्हॅन डर मर्वे
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
नेदरलँड: मॅक्स ओ’डॉड, विक्रमजीत सिंग, वेस्ली बॅरेसी, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, स्कॉट एडवर्ड्स, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन