3 चेंडूत 16 रन, अर्धशतकही, संजू सॅमसनची चेन्नईत चर्चाच चर्चा

चेन्नईत सध्या संजू सॅमसनचीच चर्चा आहे. यामागचं नेमकं कारण काय, का होतेय चर्चा, जाणून घ्या...

3 चेंडूत 16 रन, अर्धशतकही, संजू सॅमसनची चेन्नईत चर्चाच चर्चा
संजू सॅमसनImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 2:37 PM

नवी दिल्ली : चेन्नईत सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा विराट कोहली (Virat Kohli) किंवा रोहित शर्माची (Rohit Sharma) नसून संजू सॅमसनची आहे. तुम्ही म्हणाल तिरुअनंतपुरममध्ये संजूची चर्चा असली असती तर मान्य केलंही असतं. पण, चेन्नई संजू (Sanju Samson) चर्चा जरा पचनी पडत नसेल. पण, संजूनं त्याच्या दमदार कामगिरीचं पुन्ह एकदा दर्शन घडवलंय. त्यानं असं काही केलंय की तुम्हीही त्याचं कौतुक कराल.

संजूची चर्चाच चर्चा

आधी संजू सॅमसनची चर्चा त्याचं होम टाऊन असलेल्या तिरुअनंतपुरममध्ये झाली. यावेळी त्याच्या फटकारांचा आवाज तिरुअनंतपुरम याठिकाणच्या लोकांनी ऐकला. त्यानंतर 24 तासानंतर थेट चेन्नईतल्या लोकांनी संजू-संजू करायला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल असं नेमकं काय घडलं.

शानदार अर्धशतक

चेन्नईत न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या ए टीमनं तिसरा वनडे खेळला. यावेळी संजू सॅमसन यानं कर्णधारपद सांभाळत अर्धशतकही मारलं. आता संजू इतक्या धावा काढणार तर त्याचा प्रभाव त्याच्या स्कोअर कार्डवर पडणारच. कारण, यामुळे टीम इंडियाची ए टीम आराम सामना जिंकू शकते. त्यामुळे संजूची चर्चा चांगलीच रंगली आहे.

68 चेंडूत 54 धावा

टीम इंडिया ए टीमनं न्यूझीलंडविरुद्ध तुफानी खेळी करताना दमदार कामगिरी केली. यावेळी त्यानं 68 चेंडूत 54 धावा काढल्या. संजू सॅमसननं 61 चेंडूत त्याचं अर्धशतकही पूर्ण केलं. विशेष म्हणजे टीम इंडियाकडून खेळताना त्यानं नववं अर्धशतक केलंय. त्यानं अर्धशतक मारताना एक चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत.

हे विशेष…

संजू सॅमसनची खेळी तुम्हाला माहितच आहे. एकदा तापला की धू धू धुतो. त्यानं याही वेळेस तसंच केलंय. संजूनं न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 16 धावा फक्त 3 चेंडूत काढल्या. यामुळे तो चांगलाच चर्चेत आलाय.

19 वर्षांचा हिरो

तुम्हीला हे माहिती आहे का की संजूनं अर्धशतक मारलंच. पण, त्यासोबतच तिलक वर्मा यानं देखील दमदार खेळी करत अर्धशतक झळकावलंय. फक्त 19 वर्षांचा असलेला वर्मा त्याच्या दमदार कामगिरीनं ओळखला जातो. तो सध्या चांगलाच फॉर्मात आहे.

62 चेंडूत 50 धावा

तिलक वर्मानं न्यूझीलंडविरुद्ध 62 चेंडूत 50 धावा काढल्या. यापूर्वी त्यानं बंगळुरुमध्ये 121 धावांची जबरदस्त खेळी केली. चेन्नईत खेळताना त्यानं अर्धशतक केलंच. यासह एक चौकार आणि तीन षटाकरही लगावले आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.