मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामना सुरु आहे. या सामन्यात पहिली इनिंग झाली असून राजस्थान रॉयल्सला पंजाब किंग्सने 190 धावांचे टार्गेट दिले आहे. पंजाबला पहिला झटका शिखऱ धवनचा बसला. शिखर धवनने 16 बॉलमध्ये 12 धावा काढल्या असून 2 चौकार मारले आहे. त्यानंतर भानुका राजपक्षे क्लीन बोल्ड झाला. त्याने 18 बॉलमध्ये 27 धावा काढल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर तिसरा झटका मयंक अग्रवालचा बसला. त्याने 13 बॉलमध्ये 15 धावा काढल्या. त्यापैकी 2 चौकार मारले आहेत. मयंक बटलरकडून झेलबाद झाला. मयंकनंतर जॉनी बेयरस्टो आऊट झाला. त्याने 40 बॉलमध्ये 56 धावा काढल्या. त्यात 8 चौकार आणि 1 षटकार ठोकला. बेयरस्टोनंतर लिविंगस्टोन आऊट झाला. त्याने 14 बॉलमध्ये 22 धावा काढल्यात. यात त्याने 1 चौकार आणि 2 षटकार मारले.ऋषी धवनने पाच धावा काल्या. तर जितेश शर्माने 18 बॉलमध्ये 38 धावा काढल्यात. त्यात 4 चौकार आणि 2 षटकार मारले. अशा प्रकारे राजस्थान रॉयल्सला पंजाब किंग्सने 190 धावांचे टार्गेट दिलंय.
अश्विनच्या बॉलवर जोस बटलरने शिखर धवनची अप्रतिम कॅच पकडली आहे. या कॅचची सध्या जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे बटलरने एका हातात ही कॅच घेतली आहे. ही कॅच घेताना बटलर पूर्णपणे मागे झुकला होता. यावेळी तो पडण्याची देखील शक्यता होती. पण बटलरची तुफान खेळी तुम्हाला माहितच आहे. त्याने ज्या प्रकारे शिखर धवनची अप्रतिम कॅच पकडली. त्यावेळी उपस्थित देखील एकच जल्लोष करताना दिसून आले.
शिखर धवनने 16 बॉलमध्ये 12 धावा काढल्या असून 2 चौकार मारले आहे. त्यानंतर भानुका राजपक्षे क्लीन बोल्ड झाला. त्याने 18 बॉलमध्ये 27 धावा काढल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. अश्विनच्या बॉलवर जोस बटलरने शिखर धवनची अप्रतिम कॅच पकडली आहे. या कॅचची सध्या जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे बटलरने एका हातात ही कॅच घेतली आहे. ही कॅच घेताना बटलर पूर्णपणे मागे झुकला होता.