World Cup 2023 स्पर्धेतही होणार 2019 ची पुनरावृत्ती! इंग्लंडने तेव्हा असं केलं होतं कमबॅक
वनडे वर्ल्डकप इतिहासात इंग्लंडने पहिल्यांदाच 2019 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. 44 वर्षानंतर इंग्लंडला वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरता आलं होतं. त्यामुळे गतविजेता इंग्लंड संघाला यंदाही दावेदारांपैकी एक मानलं जात आहे. पण अफगाणिस्तानने पराभूत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबई : आयसीसी वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरु असून एक एक करत सामन्यांचे निकाल लागत आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत कोणता संघ पोहोचू शकतो याचे अंदाज बांधले जात आहे. स्पर्धेपूर्वी बांधलेले अनेक अंदाज आता फोल ठरताना दिसत आहे. पण असं असलं तरी क्रिकेट स्पर्धेत कधीही काहीही होऊ शकतं यात शंका नाही. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचा निकाल आश्चर्यकारक लागला. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानने इंग्लंडला 69 धावांनी पराभूत केलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडचा पाचवा नकोसा पराभव आहे. या पराभवामुळे इंग्लंडचं उपांत्य फेरीचं गणित फिस्कटेल असं सांगितलं जात आहे. पण पुढच्या सामन्यात दिग्गज खेळाडू बेन स्टोक्सचं कमबॅक होत असल्याने आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
बेन स्टोक्स आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात बेंचवर बसला होता. मात्र इंग्लंडची स्थिती पाहता पुढच्या सामन्यात मैदानात दिसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 21 ऑक्टोबरला सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं तगडं आव्हान असणार आहे. बेन स्टोक्सचं कमबॅक होताच इंग्लंडचं नशिब पालटेल? बेन स्टोक्समुळे संघात सकारात्मक वातावरण तयार होईल? या सर्व प्रश्नांची उत्तर 2019 वर्ल्डकपमध्ये दडलेली आहेत.
We lost three matches in 2019 to Australia, Pakistan & Sri Lanka.
Ben Stokes is set to come back into the team.
There are still 6 games to go – we are Double World Champions – WE CAN DO THIS 💪🏴 pic.twitter.com/K3V5pbh8X8
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) October 16, 2023
2019 मध्ये इंग्लंडने केलं होतं कमबॅक
2019 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडचा साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेने पराभव केला होता. या पराभवानंतरही इंग्लंडने कमबॅक केलं होतं आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलं होतं. पाकिस्तानने इंग्लंडला 14, श्रीलंकेने 20 आणि ऑस्ट्रेलियाने 64 धावांनी पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारल्यानंतर इंग्लंडने सलग तीन विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. इंग्लंडने भारत, न्यूझीलंड आणि सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं.
अफगाणिस्तानकडून मिळालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा पुढचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. इंग्लंडचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेशी 21 ऑक्टोबरला होणार आहे. 26 ऑक्टोबरला श्रीलंका, 29 ऑक्टोबरला भारत, 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि 9 नोव्हेंबरला नेदरलँडशी सामना होणार आहे. 11 नोव्हेबरला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात लढत होईल.