बुमराह ते वॉटसन, 5 क्रिकेटर्स जे संवाद साधता साधता स्पोर्ट्स अँकरच्याच प्रेमात पडले

| Updated on: Jul 02, 2024 | 8:01 PM

पहिल्या भेटीतच प्रेमात पडणं असं होत नाही. सुरुवातीला मैत्री होती मग बोलणं होतं आणि बोलता बोलता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. जगातील असे ५ खेळाडू आहेत. जे स्पोर्टस अँकरच्या प्रेमात पडलेत. कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

बुमराह ते वॉटसन, 5 क्रिकेटर्स जे संवाद साधता साधता स्पोर्ट्स अँकरच्याच प्रेमात पडले
Follow us on

ज्या मैदानावर त्यांनी नाव कमावले त्याच मैदानावर काही क्रिकेटर्सचे प्रेम फुलले. असे अनेक क्रिकेटर आहेत जे स्पोर्ट्स अँकरच्या प्रेमात पडले. त्यापैकीच एक म्हणजे जसप्रीत बुमराह. ज्याने भारताच्या T20 विश्वचषक 2024 च्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमराहची T20 विश्वचषक 2024 मध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवड करण्यात आली. बुमहारची पत्नी ही एक स्पोर्टस अँकर आहे. जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांची पहिली मुलाखत आयपीएल दरम्यान झाली.

2013-2014 च्या IPL हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यानंतर त्यांची पहिली मुलाखत झाली होती. संजना हिने पहिल्यांदा बुमराहची मुलाखत घेत होती.  जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांच्या अफेअरची माहिती अनेक क्रिकेटर्सना होती. दोघांनी एकत्र येत विवाह करण्याचा निर्णय घेतला. T20 विश्वचषक 2024 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलनंतर जसप्रीत बुमराहची मुलाखत घेताना संजना गणेशनचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

क्रिकेट आणि नॉन-क्रिकेट युजर्स संजना आणि बुमराहचे कपल म्हणून प्रशंसा करत आहेत. जसप्रीत आणि संजना यांची पहिली भेट आयपीएल 2013 च्या हंगामात झाली होती. तेव्हा कोणालाही वाटलं नसेल की पुढे जाऊन हे दोघे विवाह करतील. संजना आणि जसप्रीत यांनी त्यांच्या नात्याला बराच काळ मीडियापासून दूर ठेवले होते. 2021 मध्ये, जेव्हा जसप्रीतला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून परतावे लागले तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी पहिल्यांदाच समोर आली. त्यानंतर दोघांनीही एकत्र एक फोटो शेअर करत चाहत्यांना लग्नाची खुशखबर दिली. लग्नाआधी जसप्रीत आणि संजना यांनी दोन वर्षे एकमेकांना डेट केल्याचे सांगितले जाते. आता दोघांना एक मुलगा आहे ज्यांचं नाव अंगद आहे.

स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर

स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर यांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. मयंती लँगर हिने 2020 मध्ये मुलाला जन्म दिला. स्टुअर्ट बिन्नी हा 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा मुलगा आहे.

बेन कटिंग आणि एरिन हॉलंड

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग हा माजी बिग बॅश लीग क्रिकेट प्रेझेंटर एरिन हॉलंडच्या प्रेमात पडला होता. 2021 मध्ये एका मुलाखतीत तिने सांगितले की, ‘मी 2014 मध्ये बेन कटिंग याला इंस्टाग्रामवर भेटले होते. आम्ही सुरुवातीला डायरेक्ट मेसेज द्वारे संपर्क साधला. हे खूप अनौपचारिक आणि मैत्रीपूर्ण संभाषण होते. 2015 मध्ये अधिकृतपणे आम्ही डेटिंगला सुरुवात केली. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. बेन कटिंग आणि एरिन हॉलंड यांनी सप्टेंबर 2019 मध्ये लग्न केले.

मार्टिन गुप्टिल आणि लॉरा मॅकगोल्डरिक

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर मार्टिन याने स्पोर्ट्स अँकर आणि पत्रकार लॉरा मॅकगोल्डरिकसोबत विवाह केला. लॉरा मॅकगोल्डरिकने त्यांची मुलाखत घेतली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली जी काही दिवसातच ती प्रेमात बदलली. मार्टिन गुप्टिल आणि लॉरा मॅकगोल्डरिक यांनी सप्टेंबर 2014 मध्ये ऑकलंडमध्ये लग्न केले होते.

शेन वॉटसन आणि ली फर्लाँगला

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसन 2006 मध्ये ली फर्लाँगला पहिल्यांदा भेटला होता. जेव्हा ती लोकप्रिय फॉक्स स्पोर्ट्स अँकर होती. दोघांना खेळाची आवड होती. त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. या मैत्रीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले. शेन वॉटसन आणि ली फर्लाँग यांनी काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 29 मे 2010 रोजी लग्न केले. त्यांना आता विल्यम आणि माटिल्डा व्हिक्टोरिया वॉटसन ही दोन मुले आहेत.