आयपीएल सामन्याच्या एक दिवसाआधी दिल्ली कॅपिटल्सच्या ऋषभ पंतचं मोठं वक्तव्य

IPL 2024 : आयपीएल स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. दहा संघ या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेतील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात ऋषभ पंतचं कमबॅक होणार आहे. गेल्या 14 महिन्यांचा चाहत्यांचा वनवास संपणार आहे. पण या सामन्याआधी ऋषभ पंतने मोठं वक्तव्य केलं आहे.

आयपीएल सामन्याच्या एक दिवसाआधी दिल्ली कॅपिटल्सच्या ऋषभ पंतचं मोठं वक्तव्य
आयपीएल सामन्याच्या आधी दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत काय बोलून गेला, म्हणाला...
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 7:17 PM

आयपीएल स्पर्धेच्या 17 व्या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातून ऋषभ पंत क्रिकेटमध्ये पदापर्ण करणार आहे. 14 महिन्यांपूर्वी ऋषभ पंतचा अपघात झाला होता. त्यानंतर आयपीएल 2023 स्पर्धेला मुकला होता. आता 14 महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर ऋषभ पंत पुनरागमन करणार आहे. या सामन्यापूर्वी ऋषभ पंतने मोठं वक्तव्य केलं आहे. सामन्यात खेळण्यापूर्वी मनात थोडी भीती असल्याचं वक्तव्य त्याने केलं आहे. ऋषभ पंतने पत्रकार परिषदेत सांगितलं की, “मी थोडा घाबरलो आहे. नर्वस आहे. असं सर्व अनुभवत आहे. पण क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना आनंदी देखील आहे. मी उद्या पहिला सामना खेळण्यास उत्साहित आहे.”

ऋषभ पंतला पुन्हा एकदा पहिल्यासारखी लय मिळवणं खूपच कठीण आहे. त्यामुळे ऋषभ पंत आता एका वेळेस एका सामन्यावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे. ऋषभ पंतने विशाखापट्टणममध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या शिबीराबाबत सांगितलं की, ” जेव्हा मी मैदानात उतरलो तेव्हा मी काही तरी वेगळं अनुभवलं आहे. मी जेवढं शक्य होईल तितका अधिक वेळ फलंदाजी करू इच्छित आहे. प्रत्येक दिवशी अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न आहे. मी जास्त काही पुढचा विचार करत नाही. आपलं 100 टक्के देण्याचा प्रयत्न आहे.”

दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच असलेल्या रिकी पॉटिंगसाठी हे पर्व खूपच महत्त्वाचं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो संघातसोबत आहे. मात्र जेतेपदावर नाव काही कोरता आलेलं नाही. या पर्वात प्लेऑफपर्यंत मजल मारता आली नाही तर पद टिकवणं कठीण जाईल. दिल्ली कॅपिटल्सने 2020 मध्ये आयपीएलमध्ये फायनल खेळली होती. त्यावेळेस संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे होतं.

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जेक फ्रेझर- मॅकगर्क , ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, झ्ये रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.

जखमी/माघार घेतलेले खेळाडू: हॅरी ब्रूक, लुंगी एनगिडी.

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.