टीम इंडियाला 228 धावांचं टार्गेट, रुसोचे शतक
पहिली इनिंग संपली असून आता भारताला टार्गेट पूर्ण करायचंय.
नवी दिल्ली : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (INS vs SA) आज टी 20 (T20) सीरीजमधला शेवटचा सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 227 धावा केल्या आहेत. आफ्रिकेसाठी रुसोने नाबाद 100 धावा केल्या. डेव्हिड मिलर 19 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे अवघ्या क्रिकेटविश्वाचं (Cricket) लक्ष याकडे लागून आहे. टीम इंडियानं सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडीही घेतलीय. आजचा सामना निर्णायक ठरेल.
बीसीसीआय ट्विट
Innings Break!
South Africa post a formidable total of 227/3 on the board.
Scorecard – https://t.co/dpI1gl5uwA #INDvSA @mastercardindia pic.twitter.com/oiikTi69Vc
— BCCI (@BCCI) October 4, 2022
रुसोचं शतक
20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत रुसोने आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे टी-20 मधील पहिले शतक आहे.
आयसीसीचं ट्विट
What a knock ?
A hundred off just 48 balls from Rilee Rossouw ?#INDvSA | ? Scorecard: https://t.co/Za8J5e3abK pic.twitter.com/RnLm3UookP
— ICC (@ICC) October 4, 2022
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेनं क्विंटन डी कॉक आणि रिले रुसो यांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. रिले रुसोनं 48 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि आठ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 208.33 होता.
43 चेंडूत 68 धावा
क्विंटन डी कॉक 43 चेंडूत 68 धावा करून धावबाद झाला. कर्णधार टेंबा बावुमा तीन धावा करून बाद झाला आणि ट्रिस्टन स्टब्सने 18 चेंडूत 23 धावा केल्या.
स्टब्सनं दोन चौकार आणि एक षटकार लगावला. डेव्हिड मिलर पाच चेंडूत 19 धावा करून नाबाद राहिला. मिलरने आपल्या डावात तीन षटकार ठोकले. दीपक चहर आणि उमेश यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
शेवटच्या पाच षटकांत दक्षिण आफ्रिकेनं एका विकेटच्या मोबदल्यात 73 धावा केल्या. मात्र, मागील सामन्यांच्या तुलनेत 19व्या षटकात कमी धावा झाल्या. या सामन्यात सिराजने 19व्या षटकात 11 धावा दिल्या. त्याचवेळी दीपक चहरने 20व्या षटकात 24 धावा दिल्या.
टीम इंडियाचे प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, दीपक चहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेचा खेळ-11
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पेर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.