IPL Media Rights Auction : तब्बल 43 हजार कोटींना विकले आयपीएल Media Rights, कोणंय इतकी रक्कम मोजणारा?

टीव्ही पॅकेज 23,575 कोटी रुपयांना आणि डिजिटल पॅकेज 19,680 कोटी रुपयांना विकले गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

IPL Media Rights Auction : तब्बल 43 हजार कोटींना विकले आयपीएल Media Rights, कोणंय इतकी रक्कम मोजणारा?
IPLImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 1:45 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL) पुढील पाच हंगामांसाठी म्हणजेच 2023 ते 2027साठी मीडिया हक्कांच्या (Media Rights) लिलाव (Auction) झाला अशून हा व्यवहार 43 हजार कोटींमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे. आज लिलावाचा दुसरा दिवस असून मीडिया हक्क विकत घेणाऱ्यांचं नाव मात्र समोर आलेलं नाही. दुसऱ्या दिवसाची प्रक्रिया सुरू असताना ही माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय उपखंडासाठी टीव्ही आणि डिजिटल अधिकार विकले गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार टीव्हीचे हक्क प्रति सामना 57 कोटी आणि डिजिटल हक्क 48 कोटी प्रति सामन्याला विकले गेले आहेत. त्यांची एकूण बोली 43,255 कोटी आहे. टीव्ही पॅकेज 23,575 कोटी रुपयांना आणि डिजिटल पॅकेज 19,680 कोटी रुपयांना विकले गेले. मात्र, विकत घेणाऱ्यांची नावं समोर आलेली नाही.

2017 मध्ये काय झालं?

सप्टेंबर 2017 मध्ये Star Indiaने 16 हजार 347.50 कोटी रुपयांची बोली लावून 2017 ते 2022 या कालावधीसाठी मीडिया हक्क विकत घेतले होते. त्यांनी सोनी पिक्चर्सचा पराभव केला. या करारानंतर आयपीएल सामन्याची किंमत जवळपास 55 कोटी रुपयांवर गेली होती. 2008 मध्ये, सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने 8,200 कोटी रुपयांच्या बोलीवर 10 वर्षांसाठी मीडिया हक्क जिंकले. तीन वर्षांच्या कालावधीसाठी IPL चे जागतिक डिजिटल अधिकार नोव्ही डिजिटलला 2015 मध्ये ₹302.2 कोटींमध्ये देण्यात आले होते.

मीडिया अधिकारांचा इतिहास काय आहे?

आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले. सोनीने प्रथम त्याच्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले. 2008 ते 2017 पर्यंत 8,200 कोटी रुपयांना मीडिया अधिकार मिळवले होते. तेव्हा ऑनलाइन प्रक्षेपण नव्हते. यानंतर बीसीसीआयने 2018 मध्ये मीडिया हक्कांसाठीचे अधिकार पुन्हा विकले. यावेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने सोनीचा पराभव केला.

बीसीसीआयला फायदाच फायदा

  1. 410 सामने 5 वर्षात होऊ शकतात
  2. 16 हजार कोटींची बोली यापूर्वी लावली आहे
  3. 2008 मध्ये पहिल्यांदाच आयपीएलच्या प्रसारण हक्कतून बीसीसीआयला 8200 कोटी मिळाले होते
  4. तेव्हा ही दहा वर्षांसाठी बोली होती
  5. 2017 ते 2022 या कालावधीसाठी 16347 कोटी रुपये मिळाले होते.
  6. आता गेल्या वेळेपेक्षा ही बोली जवळपास तिप्पट होऊ शकते.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.