IND vs Pak : भारत-पाक सामन्याआधी आकाश चोप्रा याने सांगितली पाकिस्तानची ताकद, म्हणला….

मागील सामन्यामध्ये टीम इंडियाला पाकिस्ताने ऑल आऊट केलं होतं. रविवारी होणाऱ्या सामन्याबाबत माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने टीन इंडियासमोर असणाऱ्या मोठ्या चॅलेंजबाबत वक्तव्य केलं आहे.  

IND vs Pak : भारत-पाक सामन्याआधी आकाश चोप्रा याने सांगितली पाकिस्तानची ताकद, म्हणला....
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 2:48 PM

मुंबई : आशिया कप 2023 मधील दुसरा सामन उद्या रविवारी होणार आहे. महामुकाबल्यामध्ये टीम इंडियासमोर पाकिस्तान संघाचे तोडीस तोड असलेले हुकमी गोलंदाजांचं आव्हान असणार आहे. मागील सामन्यामध्ये टीम इंडियाला पाकिस्ताने ऑल आऊट केलं होतं. रविवारी होणाऱ्या सामन्याबाबत माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने टीन इंडियासमोर असणाऱ्या मोठ्या चॅलेंजबाबत वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय असणार चॅलेंज?

भारत-पाक सामना ज्या मैदानावर होणार आहे, त्या स्टेडिअमची खेळपट्टी पाहता गोलंदाजांना पूरक ठरेल. सपाट खेळपट्टी नसल्याने फलंदाजांना जास्त फायदा होणार नाही. त्यामुळे शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ या तिन्ही गोलंदाजांचं आव्हान टीम इंडियासमोर असणार असल्याचं आकाश चोप्रा यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तान आणि भारताचा पहिला सामना झाला होता त्यावेळी पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला सुरूंग लावलेला. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ या तिन्ही गोलंदाजांनी टीम इंडियाला 266 धावांवर गुंडाळलं होतं. त्यावेळी टीम इंडिया हा सामना गमावणार की काय अशी भीती वाटत होती. मात्र पावसाच्या एन्ट्रीने सामना रद्द करण्यात आला होता. ग्रुप स्टेजनंतर टीम इंडिया आणि पाकिस्तान परत एकदा सुपर 4 फेरीमध्ये आमने-सामने आलेत.

दरम्यान, टीम इंडियामध्ये के. एल. राहुल याने कमबॅक केलं असल्याने बॅटींगची ताकद आणखी वाढली आहे.  त्यासोबत यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहसुद्धा संघात परतल्याने टीम इंडिया आणखी मजबूत झालीये.

आशिया कपसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा

लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.