Ab De Villiers IPL 2021 RCB Team Player : टी-20 क्रिकेटचा बादशाह एबी डिव्हीलियर्सचा आयपीएलमध्येही जलवा, मात्र जेतेपदापासून लांब
भारतात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिह धोनी आणि विराट कोहलीप्रमाणे एबी डिव्हीलियर्सवर जीव ओवाळून टाकणारे क्रिकेटप्रेमी भेटतील.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू एबी डिव्हीलियर्स (Ab De Villiers) हा आयपीएलमधून (IPL) 100 कोटी रुपये कमावणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे. 14 व्या सिझनमध्ये खेळताच डिव्हीलियर्स हा मान मिळवेल. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने त्याला 11 कोटी रुपये इतक्या किंमतीत रिटेन केलं आहे. डिव्हीलियर्स आयपीएलमधून जसे पैसे कमवातो, तशा खोऱ्याने धावादेखील जमवतो.
भारतात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिह धोनी आणि विराट कोहलीप्रमाणे एबी डिव्हीलियर्सवर जीव ओवाळून टाकणारे क्रिकेटप्रेमी भेटतील. ज्याला एबी डिव्हीलियर्स आवडत नाही, असा भारतीय क्रिकेटरसिक दुर्मिळच. आपल्या बॅटने आणि मैदानावरील परफॉर्मन्सने डिव्हीलियर्सने नेहमीच भारतीयांची आणि जगभरातील क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आहेत. विराट कोहलीसोबत एबी डिव्हीलियर्स यंदा आयपीएलचं विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल.
डिव्हीलियर्सची आयपीएलमधील कमाई
एबी डिव्हीलियर्सने आतापर्यंत आयपीएलमधून 91.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 14 व्या सिझनमधील अकरा कोटींचं मानधन धरुन हा आकडा 102.5 कोटींवर जाईल. आयपीएलमधून 100 कोटी रुपये कमावणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे.
ABD ची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
एबी डिव्हीलियर्सने 114 कसोटी सामन्यांच्या 191 डावांमध्ये फलंदाजी करताना 50.7 च्या सरासरीने 8765 धावा फटकाल्या आहेत. यात त्याच्या 22 शतकांचा आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 228 सामन्यांमध्ये 53.5 च्या सरासरीने आणि 101.1 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 9577 धावा चोपल्या आहेत. यामध्ये 25 शतकं आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 78 टी-20 सामन्यांमध्ये 10 अर्धशतकांसह डिव्हीलियर्सने 1672 धावा फटकावल्या आहेत.
डिव्हीलियर्सची आयपीएलमधील कामगिरी
एबी डिव्हीलियर्सने 2008 मध्ये आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. दिल्ली डेअरडेवहिल्स (DD) संघाकडून तो आपला पहिला सिझन खेळला होता. त्यावेळी दिल्लीने 1.20 कोटी रुपयांमध्ये त्याला खरेदी केलं होतं. तीन सिझन्सनंतर 2011 मध्ये तो रॉयल चैलेंजर्स बंगळुरु संघात सहभागी झाला. डिव्हीलियर्सला RCB ने त्यावेळी पाच कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केलं होतं. 2011 पासून तो बंगळुरुकडूनच खेळत आला आहे. डिव्हीलियर्सने आतापर्यंत 169 सामने खेळले आहेत. यामध्ये 40.40 च्या सरासरीने त्याने 4 हजार 849 धावा ठोकल्या आहेत. यात त्याने 3 शतकं आणि 38 अर्धशतकं ठोकली आहेत. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 151.9 इतका जबरदस्त आहे.
फॉरमॅट
|
सामने
|
डाव
|
नाबाद
|
धावा
|
हायस्कोर
|
सरासरी
|
चेंडू
|
चेंडू
|
स्ट्राईक रेट
|
शतकं
|
अर्धशतकं
|
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी
2004–18
|
114
|
191
|
18
|
8765
|
278*
|
50.7
|
16077
|
418
|
54.5
|
22
|
46
|
ODI
2005–18
|
228
|
218
|
39
|
9577
|
176
|
53.5
|
9473
|
104
|
101.1
|
25
|
53
|
टी-20
2006–17
|
78
|
75
|
11
|
1672
|
79*
|
26.1
|
1237
|
34
|
135.2
|
0
|
10
|
IPL
2008–
|
169
|
156
|
36
|
4849
|
133*
|
40.4
|
3192
|
59
|
151.9
|
3
|
38
|