Icc World Cup 2023 | जडेजा टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये पराभूत करण्यासाठी मैदानात उतरणार

Icc World Cup 2023 | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात जडेजा टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट टीमला मदत करणार आहे. कसं ते जाणून घ्या.

Icc World Cup 2023 | जडेजा टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये पराभूत करण्यासाठी मैदानात उतरणार
वर्ल्ड कपसाठी सर्व संघांची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाचा वर्ल्ड कप अनेक खेळाडूंसाठी शेवटचा असणार आहे. काही भारतीय खेळाडू आहेत ज्यांच्यासाठीही यंदाचा वर्ल्ड कप अखेरचा असणार आहे.
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 4:24 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर भारतात आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना पार पडेल. एकूण 45 दिवस 10 स्टेडियममध्ये 48 सामने पार पडतील. एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. त्याआधी सर्व संघ हे सराव सामने खेळत आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला. तर दुसरा सामना हा 3 ऑक्टोबरला नेदरलँड विरुद्ध होणार आहे.

टीम इंडियाच्या या दुसऱ्या सराव सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी दिग्गज अजय जडेजा याला मोठी जबाबदारी मिळाली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अजय जडेजा याची आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी मेन्टॉर म्हणून नियुक्ती केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

अफगाणिस्तानची वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी राहिली आहे. अफगाणिस्तानची हीच कामगिरी सुधारण्याच्या हेतूने अजय जडेजा याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. अफगाणिस्तान टीमला 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये 10 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला होता. मात्र तेव्हाच्या आणि आताच्या टीममध्ये फार अंतर आहे.

अजय जडेजा याला मोठी जबाबदारी

अफगाणिस्तानचा पहिला सामना केव्हा?

अफगाणिस्तान क्रिकेट टीम वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 7 ऑक्टोबरपासून करणार आहे. अफगाणिस्तान पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. हा सामना धर्मशाळा इथे खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना हा टीम इंडिया विरुद्ध 11 ऑक्टोबरला पार पडेल. या सामन्यात जडेजा टीम इंडियाचा पराभव कसा करता येईल, याचे धडे अफगाणिस्तान टीमला देईल.

अजय जडेजा याची कारकीर्द

अजय जडेजा याने 15 कसोटी आणि 196 वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अजय जडेजा याने कसोटीत 576 आणि वनडेत 5 हजार 359 धावा केल्या आहेत. जडेजाने वनडेत 6 शतकं लगावली आहेत. तसेच जडेजा 1996 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. जडेजाने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा पाकिस्तान विरुद्ध 3 जून 2000 साली खेळला होता.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.