एसीसीसी इर्मजिंग आशिया कप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि युएई हे संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल युएईच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवला होता. यासह भारताच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. आता युएईसोबतचा सामना जिंकला की उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होणरा आहे. भारताचा पुढचा सामना ओमानसोबत 23 ऑक्टोबरला होणार आहे. पण आजच्या सामन्यानंतर उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. उपांत्य फेरीचा सामना 25 ऑक्टोबरला होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 27 ऑक्टोबरला होणार आहे.
दरम्यान, टीम इंडियाने पॉवर प्लेच्या पहिल्या चार षटकात युएईला दोन धक्के दिले. आर्यांश शर्मा आमि मयांक कुमार यांना स्वस्तात तंबूत पाठवलं. त्यामुळे युएई संघावर दडपण वाढलं आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), तिलक वर्मा (कर्णधार), नेहल वढेरा, आयुष बदोनी, रमनदीप सिंह, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, राहुल चाहर, रसिक सलाम, वैभव अरोरा
यूएईची प्लेइंग इलेव्हन : आर्यांश शर्मा, मयंक कुमार, विष्णु सुकुमारन, राहुल चोपड़ा, सैयद हैदर (विकेटकीपर), बासिल हमीद (कर्णधार), नीलांश केसवानी, सचित शर्मा, मो. फारूक, मोहम्मद जवादुल्लाह, ओमिद रहमान.
भारत : अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), तिलक वर्मा (कर्णधार), नेहल वढेरा, आयुष बडोनी, रमणदीप सिंग, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, राहुल चहर, रसिक दार सलाम, वैभव अरोरा, आकिब खान, हृतिक शोकीन, अनुज रावत, रविश्रीनिवासन साई किशोर.
यूएई : मयंक राजेश कुमार, तनिश सुरी, विष्णू सुकुमारन, राहुल चोप्रा, सय्यद हैदर शाह (विकेटकीपर), बासिल हमीद (कर्णधार), निलांस केसवानी, संचित शर्मा, मुहम्मद फारूख, मुहम्मद जवादुल्ला, ओमिद रहमान, ध्रुव पराशर, आर्यनश शर्मा, अकिफ राजा, अंश टंडन